पुणे: आजकाल सिमेंटच्या जंगलात माणुसकी हरवत चाललेली आपण पाहत आहोत. मात्र काही ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडते. पुणे शहरातील पाषाण मधील papilon सोसायटीतील एक कामगार जहांगीर बादशाह शेख (वय 40 वर्षे )यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्याच्या निधनामुळे त्याचे कुटूंब ऊघडे पडले. त्यांची पत्नी व दोन लहान मुली ह्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा बिकट प्रसंगी सोसायटीतील रहिवाशी त्यांच्या मदतीला धावून आले. या सर्वांनी आपआपल्या परिने मदतीचा हात पुढे केला व रूपये ९०,०००/- गोळा केले. सोसायटीचे हे कार्य बघून सुतारवाडीतील एक कार्यकर्ते बालमशेठ सुतार यांनी सोसायटीचे कौतुक केले. त्यांनी याकामी पुढाकार घेत रूपये १०,०००/- ची मदतही केली. या सामाजिक बांधिलकीतून जहांगीर यांच्या कुटुंबीयांसाठी एक लाख रूपयांची रक्कम जमा झाली.
सोसायटीच्या वतीने आयोजित एका छोट्या कार्यक्रमात ही रक्कम बालन शेठ सुतार ह्यांच्या हस्ते जहाँगीरची पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली. ह्या रकमे पैकी रूपये ९०,०००/- हे पोस्टाच्या दिर्घ ठेव योजनेत गुंतविले जेणे करून ही रक्कम जहाँगीर च्या मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात येईल व ऊर्वरीत रक्कम रोख घर खर्चासाठी देण्यात आली.
“जैतुनबी हीस सरकारी योजने च्या पेंशन स्कीम चा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच ईतर काही योजनांची मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ईतर सोसायट्यांनी सुध्दा असा आदर्श घ्यावा. त्यांनी सोसायटीच्या ऊपक्रमाची स्तुती करत आपले मनोगत व्यक्त केले.
रविंद्र पाडळे यांनी बालमशेठ सुतार ह्यांची ओळख करून स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भास्कर जाधव यांनी केले. कार्यक्रमास संजय पाटील, किसन भालेराव, विराज जोंधळे, मिलिंद मोरे, सौ. पुजा शर्मा, अमित शर्मा व डॅा. देवदत्त चौधरी ह्यांची प्रमुख उपस्थिती तर कार्यक्रमाला सोसायटीतील ईतर रहिवाशी व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मॅनेजर ईब्राहीम ह्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वांनी जैतुनबी हीस धीर दिला व मुलींचे शिक्षण पुर्ण करण्यास सर्वतोपरीने मदत करू असे आश्वासन दिले. तसेच कितीही अडचण आली तरीही शिक्षण बंद करू नकोस, असा सल्ला दिला.