पुणे: इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले; एक महिला पायलट किरकोळ जखमी
Views: 140
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 51 Second

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे हे शिकाऊ विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.मात्र या विमानात प्रशिक्षण घेत असलेली एक महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे.

बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीजवळ आज कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात काही तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’ मार्फत महिला पायलट यांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले.

ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोहचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाची मात्र दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?