पुणे: आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, पुणे मातोश्री वृद्धाश्रम येथे येथे सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग , राजा श्री शिवराय प्रतिष्ठान व बार्टी,पुणे यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्रीमती संगीता डावखर ( सहा.आयुक्त समाजकल्याण) यांनी केले व समाजकल्याणचा योजनांसहित कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.
मा. श्री. शिरीष सुमंत ( कार्यकारी अधिकारी, श्री. शिवराय प्रतिष्ठान) यांनी ज्येष्ठ नागरिक व मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले.
मा. श्रीमती माधुरी देशमुख ( पोलिस निरीक्षक भरोसा सेल) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी भरोसा सेल सुविधा व समुपदेशन याची सविस्तर माहिती दिली.
मा. श्री. खानापुरे ( पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम) यांनी सोप्या रितीने सायबर क्राईम व त्यापासून ज्येष्ठ नागरिकांची सतर्कता व बचाव याबाबत मार्गदर्शन केले.
मा. श्रीमती नीता होले( संस्थापिका महात्मा फुले सामाजिक संस्था, महात्मा फुले वंशज) यांनी ज्येष्ठांसाठीचा योजना व सन्मानाने जगणे यावर मार्गदर्शन केले.
मा. श्रीमती विद्याधर देसाई यांनी ज्येष्ठ नागरिक यांचा वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
मा. श्रीमती बारटक्के( तहसीलदार पुणे शहर) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महसूल विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार्या योजना व तरतुदी सांगून ज्येष्ठांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाचा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शासन परिपत्रकानुसार ७५/८०/१०० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला व ८०+ ज्येष्ठ नागरिक यांना ज्येष्ठ मतदार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिक दांपत्याचा सन्मान देखील करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल बंडगर ( प्रकल्प अधिकारी, बार्टी पुणे जिल्हा) व श्री. राजेंद्र शेलार( तालुका समन्वयक) यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. मल्लीनाथ हरसुरे ( विशेष समाजकल्याण अधिकारी) यांनी केले. श्रीमती नेत्राली येवले (स. क. नि. पुणे) , शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा),श्रीमती किर्ती आखाडे ( समतादूत पुणे शहर)
व श्री. मंगेश गाडीवान ( तालुका समन्वयक), श्री. राजेंद्र शेलार( तालुका समन्वयक)यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री वृद्धाश्रमचे अधिकारी कर्मचारी तसेच निवारा, जनसेवा फांऊडेशन या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले.
Read Time:4 Minute, 7 Second