सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ब्रीदवाक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Views: 136
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 36 Second

पिंपरी चिंचवड: पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील मिलिंदनगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या कमानीचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला. हा सोहळा आज (मंगळवारी, दि. 1) सकाळी संपन्न झाला.

कमानीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आरपीआय माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, आरपीआय शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, अजिज शेख, बाळासाहेब भागवत, मोनिका निकाळजे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपिस्थित होते

उदघाटन प्रसंगी रामदास आठवले म्हणाले, “बाबासाहेबांनी समतेसाठी मान अपमान पचवण्याचा प्रयत्न केला. जातिव्यवस्थेमुळे विषमतेमुळे समाजामध्ये जी भावना होती, त्यावर बाबासाहेबांनी मात केली. समाज जोडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पिंपरी चिंचवड महापालिका देशात श्रीमंत महापालिका आहे. ही उद्योगनगरी असल्यामुळे अनेक कंपन्या इथे आहेत. सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे कच्च्या घरातील माणसांना पक्की घरे मिळाली पाहिजेत. पिढ्यानपिढ्या कच्च्या घरात राहणा-यांना शौचालयासहित पक्की घरे मिळाली पाहिजेत. सिलेंडर नाही त्यांना मोफत सिलेंडर मिळाला पाहिजे. आज देशभरात 42 कोटी लोकांची बँकेमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. तर शहरात आणि ग्रामीण भागात तीन कोटी पेक्षा जास्त लोकांना घरे मिळाली आहेत.”

स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “मिलिंदनगर येथील परिसरामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या नावाने भव्य कमान व्हावी, अशी मागणी नागरिकांनी मार्च 2018 मध्ये केली होती. त्यानुसार 2 एप्रिल 2018 रोजी ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे भव्य कमान उभारण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला 7 मे 2018 रोजीच्या प्रभाग समिती सभेमध्ये मंजुरी देखील मिळवली. कमान उभारण्याच्या प्रस्तावाला स्थापत्य विभागामार्फत 20 लाख 59 हजार 466 रुपये एवढ्या रकमेची निविदा प्रसिद्ध करून 26 जुलै 2021 रोजी प्रत्यक्ष जागेवर काम सुरु झाले.

या कामासाठी कोरोना महामारी बरोबरच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतू सर्व अडचणींवर मात करून आज ह्या कमानीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडत असताना अतिशय आनंद होत आहे. या व अश्या अनेक स्वरूपाची विकासकामे आपल्या प्रभागामध्ये सुरु आहेत. तर काही पूर्णत्वास येऊ लागली आहे. तुम्ही माझ्या फेसबुक वरील पोस्ट नेहमीच पाहत असाल. त्यामध्ये मी नेहमी एक ब्रीदवाक्य टाकत असतो कि, “एकच ध्यास पिंपरीचा विकास” आपल्या सर्वांच्या साक्षीने व आशीर्वादामुळेच आज हे ब्रीद सत्यात उतरताना दिसून येत असल्याचे नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले.

महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चंद्रकांता सोनकांबळे यांची देखील मनोगते झाली. बाळासाहेब रोकडे यांनी आभार मानले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?