ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा – हिंदू जनजागृती समिती
Views: 633
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 24 Second

पिंपरी – मागील 2 वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे.या संकटाला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत होत आहे. हे होत असतानाच ओमायक्रोन सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहेअसून त्यातून योग्य मार्ग काढणे हे देशासाठी मोठे आव्हान आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यानंतर ख्रिस्ती नववर्ष चालू होते. 31 डिसेंबर, तसेच 1 जानेवारीला मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडतात असे प्रतीवर्षी दिसून येते. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अमली पदार्थांचे सेवन तसेच मद्यपान करून गाडी चालवल्याने मोठ्या प्रमाणात अपघातही होतात. ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणीही गैरप्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. या गैरप्रकारांना आला घालण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांचे सहाय्यक श्री उन्मेश मुळे यांना निवेदन देण्यात आले. परिमंडलं – १ चे उप-पोलीस आयुक्त श्री मंचक इप्पर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, परिमंडलं -२ येथील उप -पोलीस आयुक्त उपस्थित नसल्यामुळे तेथील संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.तसेच पिंपरी चिंचवड, जुन्नर, नारायणगाव , मंचर,राजगुरूनगर, तळेगाव या परिसरातील शाळा,महाविद्यालयांमध्ये निवेदन देऊन जागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाला सर्वच स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री रघुनाथ ढोबळे व धनंजय कचरे आणि धर्मप्रेमी हे प्रशासनाला निवेदन देताना उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर सर्वांनीच अश्याप्रकारे प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते,धर्मप्रेमी,हितचिंतक,राष्ट्रप्रेमी यांनी या अभियानात सहभाग घेत ठिकठिकाणी निवेदने दिली आतापर्यंत पिंपरी चिंचवड परिसर ,जुन्नर,मंचर,राजगुरूनगर,तळेगाव परिसरातील प्रशासकीय 3 कार्यालये,22 शाळा ,5 महाविद्यालये आणि अन्य 1 असे एकूण 31 ठिकणी निवेदने देण्यात आली काही भागात फलक लेखनही करण्यात आले.

ख्रिस्ती नववर्षारंभाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात .यामुळे वायू प्रदूषण होऊन सर्दी, खोकला यांसारखे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाच्या संक्रमणाची लक्षणे पहाता शासन प्रशासनाने फटाके फोडण्यावरही प्रतिबंध करावा, असे आवाहन समितीच्या वतीने या निवेदनात करण्यात आले आहे. प्रतिवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 31 डिसेंबरच्या निमित्ताने ‘संस्कृतीरक्षण मोहीम’ राबवण्यात येते. सर्वत्रच्या हिंदूंनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 8983335517 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा – हिंदू जनजागृती समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?