गोरक्षक शिवशंकर स्वामींच्या नावाने पैसे खाणार्‍या चार जणांना पोलिसांनी केले जेरबंद
Views: 36311
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 24 Second

पुणे:  बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत तुकाई चौक याठिकाणी ऋषी चव्हाण , मयूर चव्हाण , विक्रम चव्हाण व राहुल खरात सर्व रा. माळेगाव , शारदानगर बारामती ह्या 4 इसमांनी कत्तलीसाठी 5 गायी घेऊन जाणारा एक पिक अप टेम्पो नं. MH 12 MV 1514 अडवला व “आम्ही गोरक्षक शिवशंकर स्वामींची माणस आहोत , 20,000 रु. दे नाहीतर तुझ्या गाडीवर जनावरे कत्तलीसाठी घेऊन चालला आहे” अस शिवशंकर स्वामींना सांगून पोलिसांमार्फत कारवाई करायला लावतो अशी धमकी दिली…पोलिसांनी शिवशंकर स्वामींच्या नावाचा गैरवापर करून कसायांकडून पैसे मागणार्‍या वरील चारही जणांना ताब्यात घेऊन खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यांनी वर्षोनुवर्षे स्वामींच्या नावावर लाखो रु. ची खंडणी गोळा केली आहे.
शिवशंकर स्वामी सारख्या निस्वार्थी व प्रामाणिक गोरक्षकाच्या नावाचा गैरवापर करून पैसे गोळा करणार्‍या लोकांवर याआधी सन 2016 साली सिंहगडरोड पो. स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने 7 लोकांना स्वामींनी स्वतः काही जणांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

गेली ११ वर्ष शिवशंकर स्वामी हे गोवंशरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. सदर घटना पाहता कुणीही माझ्या नावाचा गैरवापर करून पैसे मागितल्यास स्वामींना ( 9921481102 ) किंवा संबंधित पोलिसांना कळवावे असे आवाहन स्वामींनी केले आहे. गोरक्षणाच्या दैवी कार्याचे पावित्र्य राखल्याबद्दल व शिवशंकर स्वामींच्या नावाचा गैरवापर करणार्‍या चारही जणांना बारामती पोलिसांनी जेरबंद केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
13%
4 Star
23%
3 Star
15%
2 Star
25%
1 Star
24%

7,971 thoughts on “गोरक्षक शिवशंकर स्वामींच्या नावाने पैसे खाणार्‍या चार जणांना पोलिसांनी केले जेरबंद