August 13, 2022
चिंचवड येथील पोदार स्कूल इयत्ता १० वी व १२वी चा शंभर टक्के निकाल; उतुंग यशाची परंपरा कायम
Views: 29
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 11 Second

पुणे: जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालात चिंचवड येथील पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले व उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

पोदार स्कूल मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी खालील प्रमाणे-
इयत्ता १० वी – रुद्रानी वाडेलकर:९९.%, वेद जाधव ९८.२%, अर्णव याडनोपित ९८%, तमन्ना रागीट ९८%
इयता १२ वी सायन्स विभाग – आशिष कुमार पांडा: ९६.२% व उम्रा फातिमा ९६.२%, आशिष पांडा ९६.२%, उमरा फातिमा ९६.२%, श्रावणी शिनगारे ९६%
इयत्ता १२ वी कॉमर्स विभाग – अरुंधिती पाटील व: ९६.७%, सृष्टी अग्रवाल ९६.४%, साक्षी मित्तल९६.२%

१९६ विदयार्थी १० वीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी १२१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले व ७५ विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्के दरम्यान गुण मिळवले.

याप्रसंगी बोलताना पोदार स्कूल च्या प्राचार्या शहनाज कोटार म्हणाल्या की “कोविड महामारीच्या व्यत्ययानंतरही, पोदार स्कूलचा १००% हा उल्लेखनीय निकाल लागला आहे. हे सर्वांच्या मेहनतीचे एकत्रित यश आहे. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांसमोर अनेक अडथळे येऊन देखील, हे मिळवलेले उत्तम यश पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. मी विशेषतः अशा मार्गदर्शकांचे कौतुक करू इच्छिते, ज्यांनी विद्यार्थ्यांवरील विश्वास कायम ठेवून त्यांना उत्तम मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून संपूर्ण वर्गाणी चांगले प्रदर्शन केले आहे. यातच पोदार स्कूलचे यश दिसून येत आहे व स्कूल प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत पोहचून त्यांना मार्गदर्शन व पाठिंबा देण्यात यशश्वी झाले आहे.

पूर्ण समर्पण, स्ट्रक्चर्ड अभ्यास आणि अभ्यासाच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करून पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे यश सुनिश्चित केले असून त्यांच्या पालकांना आणि शाळेला अभिमान आहे. पोदार स्कूल विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
Is there any news?