Read Time:12 Minute, 48 Second
पिंपरी चिंचवड: करारनाम्यानुसार कोणतीही रक्कम न भरता फ्लॅटचा ताबा घेऊन बिल्डरची फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बांधकाम व्यावसायिक तक्रारदार नरेश ठाकुरदास वाधवाणी यांनी 25 ऑगस्ट ला सुरेश जगजीत यादव, कविता सुरेश यादव, महेश जगजीत यादव यांच्या विरोधात भादवि कलम 420, 406, 448, 452, 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तक्रारदार नरेश ठाकुरदास वाधवानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा स्वतःचा पिंपरी चिंचवड परिसरात में मंगलमुर्ती डेव्हलपर्स नावाचा बांधकाम करण्याचा व्यवसाय असून, त्यावर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मौजे पिंपळे सौदागर यांसी स.नं. 13/1 ते 13/5, 14/1 ते 14/4, 21/25 ते 21/31, फ्लट नं. ई या मिळकती मी महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांचेकडील कायदेशीर आदेशान्वये सदर जागा विकसित केली असून, त्यामध्ये गणेशम फेज-02 या नावाची स्किम सन 2010-2013 मध्ये तयार केलेली आहे. त्यानुसार मी नागरीकांसाठी विक्री करीता सदरचे फ्लट व ऑफीस उपलब्ध करून दिलेले होते. त्यानुसार माझी विक्री सुरू होती. माझे परिचयाचे बरेचसे लोक फ्लॅट व ऑफीस पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी येत असत. त्यामध्ये सुरेश जगजीत यादव, कविता सुरेश यादव, महेन्द्र जगजीत यादव हे सन 2005 पासुन माझी परिचयाचे असुन ते देखील फ्लॅट व ऑफीस पाहण्यासाठी आले होते. सदर व्यक्ती हे नेहमी माझ्याकडे पूर्वीपासुन जाणे येणे व परीचय होते व ते माझ्याकडे सतत येत असत व येथील शेतकरी व गावकरी हे माझे परीचयाचे असुन मी त्यांचेकडे तुम्हाला क्लिअर टायटल जमीन घेवुन देवु शकतो, अशा प्रकारे माहिती देवून त्यांनी माझा विश्वास संपादन केलेला होता. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, काही जागा पाहिलेल्या होत्या व त्यांनी माझ्या अन्य जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारामध्ये साक्षीदार म्हणून देखील सहया केलेल्या आहेत. त्यामुळे माझा त्याचेवर पुर्ण विश्वास बसला होता. त्यादरम्यान त्यांनी गणेशम फेज रेसिडेन्सीयल स्कीम मधील पहिल्या मजल्यावरील ई बिल्डींग पलट 11 नं. 102 व गणेशम फेज ।। या स्कीम मधील कमर्शियल प्लट ई मधील पाचव्या मजल्यावरील युनिट (ऑफीस) नं. 503 हे त्यांना राहणे व ऑफीसकरीता पसंत असल्याचे सांगितले व सध्या माझ्या गावाकडे जमीनीचे मोठे व्यवहार होणार आहेत व तुम्हाला सदर व्यवहाराचे संपूर्ण पैसे देईन, असा विश्वास दाखवुन अग्रीमेंट टु सेल करण्याचे सांगितले व त्याकरिता त्यांनी तात्पुरते मी युनिट (ऑफीस) नं. 503 करीता स्वकम् रुपये 1,00,000/- व फ्लट नं. 102 करीता रक्कम रुपये 11,000/- भरन, अग्रीमेंट टु सेल नावाचा दस्तऐवज करुन घेवु असे सांगितले व मला वारंवार विनती व आग्रह करुन, अग्रीमेंट केल्यानंतर 7 ते 15 दिवसांमध्ये उर्वरीत रक्कम रुपये युनिट (ऑफीस) नं. 503 करीत रक्कम रुपये 1,19,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक कोटी एकोणीस लाख फक्त) (रेडी रेकनरप्रमाणे) व फ्लट नं. 102 करीता रक्कम रुपये 70.92.500/- (अक्षरी रक्कम रुपये सत्तर लाख ब्यांणव हजार पाचशे फक्त) दयावयाचे ठरले. तसेच गैरअर्जदार यांने पंजाब नशनल बँक, शाखा चिंचवड या बँकेत जावुन युनिट (ऑफीस) नं. 503 या मिळकतीवर स्वत: पैसे मिळावे या हेतुने लोन करीता बँकेत गहाणखत करून घेतले व त्यातुन येणारी रक्कम नियमाप्रमाणे बिल्डरला न देता स्वतःचे नावे घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजपावेतो सदरचे गहाणखत आमचे फलटवर कायम आहे. सदर माहिती सर्च रिपोर्ट घेतला असता आढळुन आली आहे. सुरेश यादव व इतर 2 साथीदार यांचा आम्हास फसविण्याच्या उद्देशाने कृत्य केले. तसेच दिनांक 16/08/2017 रोजी गाव मौजे पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज ।। या स्कीम मधील कमर्शियल प्लट ई मधील पाचव्या मजल्यावरील युनिट (ऑफीस) नं. 503 चे दुय्यम निबंधक हवेली पुणे दस्त क्रंमाक 6870/2017 दिनांक 16/08/2017 रोजी 1) श्री. सरेश जगजीत यादव व त्यांची पत्नी 2) सौ. कविता सुरेश यादव राहणार- रो हाऊस नं. 75, मयुरेवार, साई निसर्ग पार्क, पिंपळे सौदागर पुणे 27 यांनी अग्रीमेंट टु सेलच्या करारानुसार सदर अग्रीमेंट मधील पान न. 29 वरील परा नं. 01 नुसार भरणा तपशील 1,20,00,000/- पैकी 1,00,000/- बेअरर चेक क्र. 004265 दि. 11/08/2017 आय.सी.आय.सी.आय. बँकेचे दिले असून, उर्वरीत रक्कम रुपये 1,19,00000/- (अक्षरी रक्कम रुपये एक कोटी एकोणीस लाख फक्त) हे अग्रीमेंट झाल्यानंतर 7 ते 15 दिवसामध्ये देण्याचे स्पष्टपणे लेखी नमुद केलेले आहेत. सदर अग्रीमेंट मधील पान नं. 30 वरील परा क्रं. 8 मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, मुदतीत पैसे न भरल्यास सदर युनिट (ऑफिस) चे अग्रीमेंट नुसार ठरलेली उर्वरीत रक्कम न भरल्यास, सदरच्या व्यवहाराचा कराराचा भंग असेल व तो युनिट (ऑफीस) खरेदीचा व्यवहार रद्द समजण्यात येईल, असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. व सदर पानावर मा. सहदुय्यम निबंधक साहेब हवेली 17 यांचा सही शिक्का आहे. त्यानुसार त्यांना सुची क्रं. 2 (इंडेक्स टु) देखील सही करुन दिलेला आहे. तसेच गाव मौजे पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज ।। या स्कीम मधील कमर्शियल विंग ई मधील पहिल्या मजल्यावरील फ्लट नं. 102 वे दस्त क्रमांक 2787/2012 दि. 19/03/2012 रोजी महेंन्द्र जगजीत यादव व त्यांचा भाऊ सुरेश जगजीत यादव, दोघेही राहणार- रो-हाऊस नं. 75 मयुरेश्वर साई निसर्ग पार्क, पिंपळे सौदागर, पुणे – 27 यांनी अग्रीमेंट टु सेलच्या करारानुसार सदर अग्रीमेंट मधील पान नं. 30 वरील परा नं. 1, 2 व 3 मधील नमुद किमंती नुसार भरणा तपशीलाप्रमाणे रोख रक्कम रुपये 11,000/- दिनांक 19/03/2012 रोजी देवुन, अनुक्रमांक 1 ते 7 नुसार काम होईल त्याप्रमाणे टप्याटप्याने दयावयाचे आहे. सदर कलम नंबर 10 नुसार मुदतीत पैसे न भरल्यास सदर फ्लॅटचे करारनाम्यानुसार खरेदीवर महेंन्द्र जगजीत यादव व त्याचा भाऊ सुरेश जगजीत यादव यांनी ठरलेली उर्वरीत रक्कम न भरल्यास, सदर व्यवहाराचा अग्रीमेंट संपुष्टात येईल व ते कायदेशीर केलेल्या कराराचा भंग असेल व तो फ्लट खरेदीचा व्यवहार रद्द समजण्यात येईल, असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे व सदर पानावर सहदुय्यम निबंधक हवेली 14 यांचा सही शिक्का आहे. त्यानुसार त्यांनी सुची क्र. 2 (इंडेक्स टु) देखील सही करुन दिलेला आहे. सदर इंडेक्स टु नुसार कायदेशीर केलेल्या कराराप्रमाणे सुरेश जगजीत यादव व कविता सुरेश यादव यांनी सन 2017 मधील युनीट (ऑफीस) नं. 503 हे उर्वरीत रक्कम रुपये 1, 19,00,000/- न भरता बळजबरीने सदर ऑफीसचा कब्जा करन स्वतःचे ताब्यात घेतलेले आहे. तसेच महेंन्द्र जगजीत यादव व त्यांचा भाऊ सुरेश जगजीत यादव सन 2012 पासुन फ्लॅट नं. 102 हा फक्त रक्कम रुपये 11,000/- भरून बेकायदेशीरपणे खोटे आश्वासन देवुन, फसवणुक करुन, आजपावेतो इंडेक्स टु च्या अग्रीमेंट नुसार कोणतीही उर्वरीत रक्कम रुपये 70,92,500/- (अक्षरी रक्कम रुपये सत्तर लाख ब्यान्नव हजार पाचशे फक्त) न भरता, खोटे दस्तऐवज करुन, फसवणुक केलेली आहे. सदर बाबत आम्ही वेळोवेळी वरील सुरेश यादव व इतर 2 यांना वेळोवेळी करारानुसार पैसे भरावयास सांगितले असता, आजपर्यंत त्यांनी अग्रीमेंट कराराप्रमाणे कोणतेही पैसे भरलेले नाही. यावरुन त्यांची सदर प्रकरणामध्ये जाणीवपुर्वेक, बेकायदेशीरपणे फ्लटचा ताबा स्वत:कडे ठेवुन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट करुन फसवणुक करण्याचा हेतु स्पष्टपणे दिसुन येत आहे. सदर बाबत दिनांक 20/5/2022 रोजी दिनंाक व दिनांक 02/06/2022 रोजी वृत्तपत्रामध्ये नोटीस देखील देण्यात आलेली आहे. तरी गाव मौजे पिंपळे सौदागर येथील मौजे पिंपळे सौदागर यांसी स.नं. 13/1 ते 13/5, 14/1 ते 14/4, 21/25 ते 21/31, या मिळकतीमधील गणेशम फेज ।। या स्कीम मधील कमर्शियल प्लट ई मधील पाचव्या मजल्यावरील युनिट (ऑफीस) नं. 503 व गणेशम फेज । रेसिडेन्सीयल स्कीम मधील पहिल्या मजल्यावरील फ्लट नं. 102 या मिळकती बेकायदेशीर ताब्यात घेण्याच्या व आमची आर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशाने आमच्या बरोबर कायदेशीर खरेदीखत करून, त्यानुसार पैसे अदा न करता, कायदेशीर करार भंग करून, आमची आर्थिक फसवणुक केली तसेच आम्ही त्यांना कोणतीही लेखी ताबा पावती दिलेली नसताना सुध्दा त्यांनी बळजबरीने व बेकायदेशीर सदर फ्लट व युनिट (ऑफीस) मध्ये प्रवेश करून ते ताब्यात घेऊन माझी आर्थिक फसवणुक केल्याने त्याच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.