पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील सेक्टर 22, निगडी येथे ‘प्लागोथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन करत कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छतेची शपथ घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राहुल नगर पासुन स्मशान भूमी DCB हद्द येथे शेवट करण्यात आला. स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन नागरीकांनी सकारात्मक प्रतीसाद देत महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी संकल्प केला.
प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन स्वच्छतेबाबत नागरीकांना संदेश दिला. महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात प्रथम स्थानी येण्यासाठी सर्वोत्तरीने प्रयत्न करत असुन, नागरीकांच्या उत्स्फूर्त सहभागाने प्रयत्नांना यश येत आहे.
स्वच्छतेच्या या चळवळी मध्ये सर्व नागरीकांनी सहभाग घेऊन एक लोक चळवळ ऊभी व्हावी हा महापालिकेचा उद्देश आहे, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, काळे कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग, रोकडे साहेब कनीष्ठ अभीयंता विद्युत विभाग, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधिर वाघमारे, तसेच मा.नगरसेवक सचीन चिखले, प्रभाग क्रमांक १३ चे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, सागर कोरे, राजू चटोले, बिव्हीजी सुपरवाईजर अबु जाधव जनवानी संस्थेचे वॉर्ड इंचार्ज ज्ञानेश्वर शेळके, सामाजिक कार्यकर्ते, सर्व फ क्षेत्रीय कार्यालयामधील महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागातील सफाई कामगार तसेच सर्व जनवाणी पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.