पिंपरी चिंचवड: एक वर्षानंतर खुनाच्या गुन्हयाची उकल; गुन्हे शाखा युनिट-१ उल्लेखनीय कामगिरी
Views: 176
0 0

Share with:


Read Time:8 Minute, 9 Second

पिंपरी चिंचवड दि.०५/०८/२०२१ रोजी चिखली पोलीस स्टेशन हददीत हरगुडे वस्ती येथे महिला कमल बाबुराव खाणेकर उर्फ़ नुरजहा अजिज कुरेशी हिचा तिचे राहते घरामध्ये हातापाय बांधुन, तोंडाला चिकटटेप लावुन, तिचा गळा दाबुन निर्घुनपणे खुन करण्यात आलेला होता. त्याबाबत चिखली पोलीस स्टेशनमध्ये गु. रजि. नं.३८५ / २०२१ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता.

गुन्हेगारानी नियोजनबदध खुन केलेला असल्याने कोणताही पुरावा सोडलेला नव्हता. पोलीस तपासात जंगजंग पच्छाडत होते परंतू हाती काहिही लागत नव्हते. गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे अव्हान पोलीस यंत्रणे समोर होते.

गुन्हे शाखा युनिट-१ हयानी हे आव्हान स्विकारुन उत्तरप्रदेश व बिहार राज्यातुन आलेले व चिखली व एमआयडीसी, भोसरी परीसरात राहणारे रेकार्डवरील गुन्हेगाराना चेक करण्याचे ठरवुन त्याप्रमाणे कारवाई करत असताना ब-याचश्या आरोपींना युनिट कार्यालयात आणुन त्याच्याकडुन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तपासा दरम्यान पो. शि. २५५९ महाले, युनिट १ याने चिखली पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्टचे गुन्हयामध्ये अटक झालेला आरोपी नामे १) मोहंमद मोनिष इसरार अहमद शेख, वय २५ वर्षे, रा.विरबाबा चौक, हिना बेकरीचे बाजुला साईनगर देहुरोड पुणे यास चौकशी कामी गुन्हे शाखा युनिट १ कार्यालय आणुन त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती दिली होती. त्याच्याकडे सखोल तपास करता त्याने व त्याचे साथीदार २. वासिब खान, रा. झेंडेमळा, देहुगाव, जि. पुणे, ३. अब्दुल मुनाफ अन्सारी, रा. रूपीनगर, तळवडे, पुणे, ४. रईसउद्दीन राईन, रा. अंगणवाडी रोड, मोरेवस्ती चिखली, पुणे व ईतर तिन जण असे चौघांनी मिळुन हरगुडे वस्ती येथे एकटी राहणारी महिला हीचा खुन केला असल्याची माहिती त्याने दिली.

तसेच सदरची महिला ही एकटीच राहत असुन तिच्या अंगावर भरपुर प्रमाणात दागिने असतात तसेच ति जमिनीची खरेदी विक्री करत असल्याने तिच्या घरात मोठया प्रमाणात पैसे असण्याची शक्यता असल्याची असल्याने तिचा गेम केल्यास पुर्ण आयुष्य सेट होईल असे विचार करुन त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करुन दि. ०५.०८.२०२१ रोजी मध्यरात्री मयत महिलेच्या घरात प्रवेश करुन तिचे हातपाय बांधुन, तिचे तोंडास चिकटपट्टी लावुन, तिचा गळा दाबुन निघुन खुन करून तिचे घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांनी कबुल केले.

आरोपी निष्पन्न झाले तरी त्यांना पकडण्याचे मोठे अवाहन युनिट १ विभागाकडे होते. पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे व सहा पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आलेली होती. नियोजनबदध तपासात प्रथमता संशयीत आरोपी क्र. १ कडुन प्राप्त माहितीच्या अधारावर त्याचा साथीदार नामे २) वासिब उर्फ टोनू मोनू रईस खान, वय २२ वर्षे, रा. झेंडेमळा, देहुगाव, जि. पुणे यास देहु परीसरातून ताब्यात घेण्यात आले.

तपासात आरोपी क्र. २ व ३ याचे हे पालघर व बांद्रा, मुंबई येथे असलाची माहिती मिळाल्याने त्यानुसार दोन तपास पथके वेळ न घालवता तात्काळ रवाना करण्यात आलेली होती.

आरोपी ठिकाण वांरवार बदलत होते. पालघर येथे गेलेले पोलीस पथक हे पालघर येथे पाहचले असताना आरोपीस पोलीस त्यास पकडणे कामी येत असल्याचा सुगावा लागल्याने तो प्रथम दहिसर परीसरात नंतर बोरीवली वरुन ठाणे शहरात गेल्याची माहिती मिळत होती. तपास पथकाने त्याचा पाठलाग लोणावळा एक्सप्रेस हायवे इतपर्यन्त करुन आरोपी ३) अब्दुल मुनाफ अब्दुल मलीक अन्सारी, वय २४ वर्षे, रा. कोयना सोसायटी, नासिर शेख यांचे रूममध्ये, रूपीनगर, तळवडे, पुणे, यास ताब्यात घेण्यात आले.

तसेच बांद्रा,मुंबई येथे गेलेल्या दुसऱ्या पोलीस पथकाने सुध्दा आरोपीचा पाठपुरावा करत त्यास किवळेफाटा, रावेत या ठिकाणी सापळा लावुन आरोपी ४) रईसउद्दीन सुलतान अहमद राईन, वय ४० वर्षे, रा. अंगणवाडी रोड, हिमारल बेकरीमध्ये, मोरेवस्ती चिखली, पुणे यांस रावेत येथून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींनी त्यांचे ईतर ३ साथीदाराचे मदतीने हरगुडे वस्ती भागामध्ये रेकी करून मयत बाई ही जागेची खरेदी विक्री करते व तिच्याकडे भरपुर पैसे, सोने आहेत अशी माहिती काढली होती. त्यानुसार नियोजन करुन रात्रीचे वेळी पाळत ठेवुन तिचे घरामध्ये घुसुन तिचे दोरीने हातपाय बांधुन, तोंडास चिकटपट्टी लावुन तिचा गळा दाबुन खुन करून तिचे घरातील रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करून नेल्याचे कबुल केलेले आहे.

अश्या प्रकाराने एक वर्ष उघडकीस न आलेल्या किचकट गुन्हयाची उकल पोलीस आयुक्त  अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पो. उप नि. राठोड, पो. हवा. ८४० मुल्ला, पो. हवा. १३४१ खानविलकर, पो. हवा. १४१७ महाडीक, पो.हवा. ४५४ कोकाटे, पो. हवा. ९८४ बो-हाडे, पो. हवा. ५१८ पठाण, पो. हवा. ९७७ जावळे, पो.ह. ७५४ कमले, पो. ना. १५२४ मोरे, पो. ना. १६९० हिरळकर, पो. ना. १५०३ सरवदे, पो.शि. २९५९ महाले, पो. शि. २८१० रूपनवर, पो.शि. २६३३ भोईर, पो.शि. १३०४ जायभाये यांचे पथकाने केली आहे. पोलीस हवालदार माळी यांनी तपास पथकास विषेश सहकार्य केलेले आहे..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?