पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन
Views: 78
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 7 Second

पिंपरी चिंचवड– पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.सदर नोकर भरती प्रकिये मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे.या करिता मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, सदर भेटी दरम्यान कोरोना महामारीच्या संकटामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लघु-उद्योग बंद पडलेले असून त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत,त्यामुळे शहरातील बेरोजगारांचा आलेख उंचावला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नागरी म्हणून ओळखले जाते. राज्यातून तसेच परराज्यातून अनेक नागरिक रोजगाराच्या निमिताने शहरात दाखल होत असतात. उद्योग क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मनमानी कारभारामुळे शहरातील भूमिपुत्रांवर आज बेकारीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांना १० ते १२ हजार रुपयांमध्ये खाजगी संस्थेमध्ये नोकरी स्वीकारावी लागत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा यापूर्वीच “ब” वर्गामध्ये समावेश झालेला असून पिंपरी चिंचवड महापालिका सेवा नियम २०१६ अन्वये महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी आरक्षित केलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या ज्या भूमिपुत्रांचे ५०० चौ.मीटर पासून पुढील क्षेत्र संरक्षण क्षेत्राकरिता किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या आहेत. अश्या सर्व पिंपरी चिंचवड बाधितांचे वारसदारांना नव्या आकृतीबंधाद्वारे नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आलेले राखीव आरक्षणा व्यतिरिक्त जादा २० टक्के अतिरिक्त आरक्षण राहील असा नियम आहे असे असताना देखील आता होत असलेल्या नोकर भरतीमध्ये सदर नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.याबाबत मी माननीय आयुक्तांना वारंवार पत्र व्यवहार देखील केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या दिल्या पाहिजे असा आदेश राज्य शासनाने वेळोवेळी पारित केला आहे, अशी माहिती कोश्यारी यांना देण्यात आली.
भगतसिंग कोश्यारी यांनी स्थानिक नागरिकांच्या बाबतीत संपूर्ण प्रश्न सविस्तर समजून घेतल्यानंतर सुरु असलेल्या नोकर भरती प्रक्रीयेमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच स्थानिक भूमिपुत्रांना ८०% नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासनाला उचित असे निर्देश देऊ असे आश्वासन दिले आहे.
यावेळी भगतसिंग कोश्यारी भेटीस संदीप वाघेरे,अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप,उमेश खंदारे हे मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?