पिंपरी चिंचवड: शहरातील खड्डे बुजवावेत यासाठी मनपा आयुक्त कक्षाच्या बाहेर पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये निगडी ते दापोडी या प्रमुख महामार्गासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे आहे. नुकताच पावसाळा संपत आलेला आहे. या पाऊसकाळात शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्यांच्या प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय या खड्यामुळे जागोजागी छोटेमोठे अपघात ही होताना दिसत आहे.
आता थोड्यात दिवसात दिवाळी सण येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची खरेदी किंवा इतर कारणासाठी मोठी वर्दळ सुरु होणार आहे. सर्वच शहरातील सर्व रस्त्यांवर पडलेले खड़े तातडीने बुजवून रस्ते पूर्ववत करणेसंदर्भात
संबंधिताना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कडे करण्यात आली.
या वेळी आंदोलन करण्यासाठी अश्विनी बांगर, राजु सावळे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सिमा बेलापूरकर, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण, अलेक्स अप्पा मोझेस, सुरेश सकट, नितील सूर्यवंशी, नारायण पठारे, कृष्णा महाजन, शिशिर महाबलेश्वरकर, गणेश अवघडे, आकाश पांचाळ, विशाल साळुंके, दुर्गे कैलास, वैशाली बोत्रे, विद्या कुलकर्णी, पंकज चपटे हे उपस्थित होते.