पिंपरी चिंचवड: बांधकाम व्यवसाईक राजेंद्र आनंदकुमार बिजलानी, सोनिया राजेंद्र बिजलानी व दिलीप सत्यपाल भागवानी यांच्याशी हात मिळवणूक करून सर्वसाधारण नागरिकांना त्रास देणाऱ्या महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी विभागाचे तत्कालीन सहशहर अभियंते मकरंद निकम, कार्यकारी अभियंता सुनील(दादा) भागवानी, व उपअभियंता नितीन निंबाळकर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून आम्हास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे गृह रचना संस्थेचे अध्यक्ष उमेश गुंड आणि इतर सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
विजयनगर राहटणी काळेवाडी येथील अमृतधाम एबी विंग सहकारी गृह रचना इमारतीचे बांधकाम करणारे बांधकाम व्यवसायिक मे.आनंद डेव्हलपर्स तर्फे राजेंद्र आनंदकुमार बिजलानी, सोनिया राजेंद्र बिजलानी व अदि ग्रुप तर्फे दिलीप सत्यपाल भागवानी यांनी मनपाच्या मंजूर नकाशा प्रमाणे काम केले नसल्याने त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, व तत्कालीन शहर अभियंता राजन पाटील त्याबाबतीत वरील संदर्भात दर्शवण्यात आलेल्या तारखेला वारंवार तक्रारीद्वारे कळवले असता, तत्कालीन सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता सुनील (दादा) भागवाणी तसेच उपअभियंता बांधकाम परवानगी विभाग नितीन निंबाळकर व इतर अधिकारी जे आमच्या विभागीय क्षेत्राशी संबंधित असणारे,अधिकारी व कर्मचारी यांनी बांधकाम व्यवसाईका विरोधात कोणतीही कारवाई न करता आम्ही केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. याउलट आम्ही माहिती अधिकार कायदा २००५, नुसार आवश्यक असणारी माहिती मागवली असता ती देखील ठराविक वेळेमध्ये न देता कु हेतूने तारखे मध्ये बेकायदेशीर खाडाखोड केली आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
यावेळी पत्रकार परिषदेत गृह रचना सोसायटीचे सचिव नानू कुट्टन, खजिनदार एस बी मुगळी, सदस्य कौसर एस सय्यद सदस्य , अर्चना जी. कोरे सदस्य विजयकुमार खरात उपस्थित होते.