पिंपरी चिंचवड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक मोरवाडी येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने धनगर समाजातील महिलांसाठी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. नगरसेविका आशा धायगुडे यांचा सन्मान सर्व समाज बांधवांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महावीर काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच गृहिणी आशा 30 महिलांचा सन्मान करण्यात आला. भविष्य काळात महिलांनी ही पुरुषासोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा,तसेच सामाजिक बांधिलकी जपत संघटना दरवर्षी समाजातील महिलांचा सन्मान महिला दिनाच्या निमित्ताने करत असते, यापुढील काळातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात होईल असे महावीर काळे यांनी सांगितले. नगरसेविका आशाताई धायगुडे, उपअभियंता विजय भोजने,संघटनेचे कार्याध्यक्ष संजय कवितके यांनी मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना वीणाताई सोनवलकर, प्रभा दुर्गे,प्रतिमा काळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशोदा नाईकवाडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले. यामध्ये सुनील बनसोडे, हिरकांत गाडेकर, संजय नाईकवाडे,संतोष पांढरे, संजय कवितके,बंडू मारकड,नवनाथ देवकाते, शंकर दातीर,महादेव कारंडे,नितीन वाघमोडे,दीपक काळे, वंदना ताई धनगर,तानाजी ढाळे, बंडू लोखंडे, नागनाथ वायकुळे,बापू येळे सर,बाळासाहेब यमगर,दादासाहेब कोपणर,रोहिदास पोटे, आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.