पिंपरी चिंचवड: सदस्य नोंदणी अभियानाद्वारे शहर काँग्रेसचा घरोघरी संपर्क
Views: 241
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 40 Second

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कडून सध्या शहरभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियान २०२२ अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शहरात विविध भागांत संपर्क साधत सदस्य नोंदणी केली जात आहे व जनसामान्यांना पक्षात सहभागी करून पक्षबांधणी केली जात आहे.

आज वर शहरात विविध भागांत विविध प्रभागात सुमारे २३ एवढ्या ठिकाणी काँग्रेस सदस्य नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत व या ठिकाणाहून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जनसंपर्क साधला जात आहे व या मोहीमेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे या अभियाना अंतर्गत नागरिकांचे फॅार्मस् भरून घेतले जात आहेत. मंडप टाकून केंद्र उभारणे, प्रचार पत्रके वाटणे,
अभियानाचे छापील टी शर्टस् घालून घरोघरी संपर्क करणे तसेच नोंदणी केंद्रावरून नागरीकांशी संपर्क करणे अशा प्रकारे सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.

शहरात दापोडी, कासारवाडी, अजंठानगर, काळेवाडी, भारत माता चौक, विजयनगर, वाकड, चिंचवडगाव, पिपंरी कॅम्प, पिंपरी गाव, आनंदनगर, भाटनगर, दिघी, दत्तनगर, विजयनगर, आकुर्डी, चिखली, सांगवी, पिंपळे गुरव आदि व इतरही ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहीती देताना अभियानाचे आयोजक व काँग्रेस शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम यांनी सांगितले कि, “काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानाद्वारे आजवर शहरात २३ ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत व या पुढे ही उभारण्यात येणार आहेत या केंद्रांद्वारे
तसेच घरोघरी जाऊन मोठ्या उत्सफुर्त वातावरणात सदस्य नोंदणी कार्य सुरू आहे या अभियानातंर्गत नागरिक
समस्या देखील सांगत आहेत व त्यांचे निराकरण करणे ही सुरू आहे या
माध्यमातून अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहचण्याचे काम होत आहे काँग्रेस पक्ष अधिक जोमाने तळागाळात पोहचत आहे व नागरी प्रतिसाद उत्तम मिळत आहे येणा-या काळात याचा परिणाम निश्चितपणे
सत्ता परिवर्तनाच्या कामात होईल व हि एकवटलेली जनशक्ती हि भाजपाची जुलमी, भ्रष्ट, खोटारडी, फसवी, कर रुपाने लूट करणारी, महागाई वाढविणारी, जातीयवादी, भांडवलदार रक्षक व शेतकरी- कामगार भक्षक असणारी हि सत्ता उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या अभियानातून सध्या
मिळत आहे. माझी सर्व नागरिकांना विंनती आहे की सर्वानी या परिवर्तनाच्या लोकचळवळीत सहभागी व्हावे निश्चित पणे आपली सर्वसामान्यांच्या हिताची काँग्रेस ची सत्ता महानगरपालिकेत आपल्या पाठबळानेच येत आहे.”

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?