
मुंबई: राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी कसोटी आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी पार पडणार आहे. असे असताना राज्याचे लक्ष लागून असलेला मोठा प्रश्न तो म्हणजे इंधन दर कपातीचा, यावर शिंदे आणि फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. याचदरम्यान केंद्रानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला होता पण महाराष्ट्राने केला नव्हता, महाराष्ट्र सरकार लवकरच याविषयी निर्णय घेईल. तसेच हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटींचा निधी देणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे.
दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी पेट्रोल, डिझेलवरील (Petrol, diesel) अबकारी कर कमी केला होता. मात्र, ठाकरे सरकारने आम्हाला जीएसटी परतावा दिलेला नाही, यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत कर कपात फेटाळली होती. यामुळे इतर राज्यांत १५-२० रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला होता.
असे असताना दोन्ही वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर दर कपात न केल्याने टीका केली होती. यामुळे आता शिंदे जरी मुख्यमंत्री होणार असले, फडणवीसांनी त्याग केला असला तरी भाजपाच्याच पाठिंब्याचे सरकार असल्याने शिंदे-फडणवीस राज्यातील पेट्रोल डिझेलचे जादाचे दर कमी करतात का? जनतेवरील महागाईचा बोजा कमी करतात का? शिंदे- भाजपा सरकार स्थापन झाल्याझाल्या जनतेला दिलासा देतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना केंद्रानंतर काही राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता, महाराष्ट्र सरकार लवकरच याविषयी निर्णय घेण्यात अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.