आर्यन्स समूहाचे लोकाभिमुख प्रकल्प व्यवस्थेला बळकटी देतील – मनोहर जगताप
Views: 630
6 0

Share with:


Read Time:5 Minute, 35 Second

पुणे – येथील आर्यन्स उद्योग समूहाने विविध क्षेत्रात सुरू केलेले लोकाभिमुख प्रकल्प पुण्यापासून राज्यभर आणि पुढे देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक व आर्थिक व्यवस्थेला बळकटी देतील असा विश्वास आर्यन्स समूहाचे सीईओ मनोहर जगताप यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रदिन व कामगारदिनाचे औचित्य साधत आर्यन्स गृप ऑफ कंपनीजच्या वतीने समुहाच्या विविध प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी यशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील एरंडवणे भागातील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या
शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर समुहाचे अध्यक्ष मुकुंद जगताप,कार्यकारी संचालिका सौ.स्मिता शितोळे – जगताप, ओमा फौंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप,सुरेश रणवरे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.

*५ हजार कामगारांना मोफत विमा-*
आर्यन्स समूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कामगार दिनानिमित्त रिक्षाचालक व विविध क्षेत्रातील ५ हजार कामगारांना मोफत १ लाखाचा वर्षभराच्या विम्याचा लाभ मिळावा म्हणून पॉलिसीज काढून देण्यात आल्या. यात संतोष पवार,राजकुमार बनवसे,शिवाजी चोरगे,रुपेश कांबळे,लक्ष्मण पडवळ,संभाजी जामदार, साईनाथ भांडेकर,कैलास गायकवाड,सुधाकर खोपडे आदींना प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वाटप करण्यात आले.

*गरजूंना शिवमुद्रा शिष्यवृत्तीचा लाभ -*
समाजात प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना
शिवमुद्रा नावाने शिष्यवृत्ती सुरू करून आजच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात वैष्णवी ननवरे आणि विश्वजित पवार या दोघांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.आर्यन्स समुहाच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वयाची कोणतीही अट न लावता शिवमुद्रा शिष्यवृत्ती
अखंडितपणे वाटप करण्याची घोषणा समुहाच्या वतीने करण्यात आली.

*जिल्हा न्यायालय चौकातील कामगार पुतळ्याचे सुशोभीकरण -*

शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या चौकातील वर्षानुवर्षापासून दुर्लक्षित कामगार पुतळ्याचे प्रसिद्ध शिल्पकार नितीन कुलकर्णी व एकनाथ कदम यांच्या संकल्पनेतून आर्यन्स समूह सुशोभीकरण करणार आहे.
या कामाचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात येवून लगेचच येत्या आठवडाभरात पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे समूहाने जाहीर केले.

*आर्यन्स समूह राबवणार ‘म’ संकल्पना -*

समूहाच्या यशोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ‘म’ संकल्पना राबविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य कायम स्मरणात राहावे म्हणून महत्वाकांक्षी उपक्रम,रोजगार – स्वयंरोजगार आणि नव्या उमेदीने शिक्षण, उद्योग किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात येणाऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘म’ वृत्तीने काम करणार असल्याची भावना सुद्धा आर्यन्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी जाहीर केली. यावेळी या संकल्पनेच्या ‘म’ या आद्य अक्षराचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

आर्यन्स समुहाच्या यशोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ईश्वर वाघमारे, विजय सपकाळ,वैशाली ननावरे,
निशा वाळुंज, नेहा जगताप, करिश्मा काकडे, सुमित रणवरे, स्नेहा जगताप,संजय शेंडगे,संदीप राऊत,नितीन धुमाळ, महेश रणवरे,कामेश मोदी, निलेश धुमाळ,गोरख पवार, अमोल काकडे,अमित रणवरे, मंजिरी हगवणे,स्वप्नाली जगताप,खूबचंद शितोळे,सुरेश रणवरे या समुहाच्या संचालकांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले व आभार किरणजीत लोहार यांनी मानले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?