परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार धर्माला आलेली ग्लानी दूर होऊन लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल  – डॉ. नील माधव दास
Views: 302
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 43 Second

पुणे: परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी ठरवले असते तर पुष्कळ प्रसिद्धी आणि पैसा कमवू शकले असते; मात्र त्यांनी हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’चा निर्धार केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली ‘सनातन संस्था’ सध्या विश्‍वव्यापी बनत आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन वर्ष 2002 मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ स्थापन झाली आहे. सध्या समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंदू संघटन उभे होत आहे. श्रीकृष्णाच्या वचनानसार कलियुगात धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी श्रीकृष्णाच्या रुपात साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जन्म घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ लवकरच होईल याची आम्हाला खात्री आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन झारखंड राज्यातील ‘तरुण हिंदु’चेे अध्यक्ष श्री. नील माधव दास यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने *’परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ईश्‍वरी कार्य !’* या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादत बोलत होेते.

या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बाळकृष्ण बाईत महाराज म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात अवतरित होत आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलींग सापडणे, काश्मीर मधील 370 कलम हटवले जाणे या घटना म्हणजे हिंदु राष्ट्राची नांदीच आहेत. संतांनी केलेले भाकित आता खरे ठरत आहे. स्वभावदोष निर्मूलनाद्वारे आनंदप्राप्ती कशी करावी, हे सनातन संस्थेचे ‘स्वभावदोष निर्मूलन’ आणि ‘अहं निर्मूलन’ या ग्रंथांमुळे समजले. या ग्रंथांच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने अध्यात्माची ओळख झाली.

या वेळी ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेन अखिल विश्वाचे कल्याण होणार आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेनुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महान कार्य आरंभले आहे. धर्मसंस्थापना हे मोठे शिवधनुष्य आहे आणि हे कार्य एखादा महापुरुष किंवा पुण्यात्माच करू शकतो. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हिंदूंनी तटस्थ राहून न पहाता त्यामध्ये आपली क्षमता आणि कौशल्य यांनुसार प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे हा संबंधित हिंदूचा पुरुषार्थ आहे आणि यामुळे त्याची पारलौकीक उन्नती निश्‍चितच होणार आहे.

या वेळी कोल्हापूर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी म्हणाले की, मी गेली 12-13 वर्षे सनातन संस्थेच्या धर्मसभा, राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या अनुषंगाने शासनाला निवेदन देणे आदी कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे. संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे हिंदु धर्माची महानता सर्वांना सांगत आहेत. हिंदु राष्ट्राची निर्मिती व्हावी, अशी सर्व हिंदूंची प्रार्थना आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?