पिंपरी चिंचवड :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एकता चौक येथे फिनिक्स सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले, तसेच सांगवी मधील उद्यानामध्ये वॉकिंगला व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या fitness kit चे वाटप श्री.संतोषजी कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले. तसेच मधुबन सोसा. येथिल उद्यानात सौ.शारदा सोनवणे यांच्या प्रयत्नातून नागरीकाना करमणुकीसाठी सांऊड सिस्टीम बसविण्यात आले व महापौर माई ढोरे यांच्या महापौर निधीतून सांगवी गंगानगर ते आनंद नगर चौक, साई चौक, प्रिर्यदर्शनी नगर छावा चौक येथे नागरीकांना व्यायाम करण्यासाठी ओपण जिम व PWD चौक येथे स्मार्ट बसस्थानकाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी महापौर माई उर्फ उषा ढोरे, मा.नगरसेवक शंकर जगताप, हर्षल ढोरे, श्री.संतोष कांबळे, सौ.शारदा सोनवणे(नगरसदस्य), संजय जगताप, दर्शना कुभारकर, दिलीप तनपुरे सर, प्रकाश ढमाले, मधुकर त्रिभुवन, रवी कोर्दे, शाम मातोळे, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.