पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात पवित्र प्रणाली मार्फत दिनांक ०९/०८/२०१९ रोजी शिक्षणाधिकारी यांचे लोगीनवर उपलब्ध झालेले यादीतून पात्र उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे वतीने जारी करण्यात आले आहेत.अशी माहिती वाघेरे यांनी दिली आहे. यामुळे सर्व शिक्षक कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात एकूण ६८ शिक्षन सेवक मानधन स्वरूपात आपली सेवा देत होते त्यांचा नियमित वेतनश्रेणीमध्ये समावेश करणेकामी तत्कालीन आयुक्त श्री,राजेश पाटील यांचेकडे विनंती करण्यात आली होती परंतु त्यांची बदली झाल्याने १५ दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह याची भेट घेऊन शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणीमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली होती त्यानुसार शिक्षण सेवक नेमणूक आदेशातील व हमिपात्रातील अटीनुसार संबधित मुख्याध्यापकांनी शिक्षण सेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी व कामकाज अहवाल सादर केले त्यामधील या कर्मचाऱ्यांचे परिविक्षाधीन कालावधी मधील कामकाज ,हजेरी,व वर्तणूक समाधानकारक असल्याचे व सध्यस्थितीतील त्यांची खातेनिहाय चौकशी चालू असल्याचे अथवा प्रस्थावित नसल्याने त्यांना नियमित वेतनश्रेणीमध्ये नेमणूक देण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने देण्यात आले आहेत.
शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणीमध्ये नेमणूक देण्याचा आदेश जारी केल्यामुळे सर्व शिक्षण सेवकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आज संदीप वाघेरे व शिक्षण सेवक यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबळे पाटील व उपायुक्त संदीप खोत यांचे महापालिका इमारतीमध्ये आभार मानण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक संदीप वाघेरे,शिक्षण सेवक प्रतिनिधी अक्षय गोरे सर,अभिजित वैरागे,वैभव जोशी,वासंती चव्हाण,वृषाली भंडारे,शिवाजी दौंडकर सर,येणारे सर,सतीश पाटीलसर,ढमाळ सर,पोटघन सर आदी मान्यवर उपस्थित होते.