पुणे,११ डिसेंबर २०२१ – लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) आर्थिकदृष्या वंचित पार्श्वभूमी असणार्या आणि शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल मुलींच्या निशुल्क शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी घेऊन आले आहे. इच्छुकांना अर्ज करण्याचे आव्हान फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात २०२१-२०२२ मध्ये प्रथम शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात.
लीला पुनावाला,अध्यक्षा,एलपीएफ (पद्मश्री प्राप्तकर्ता, १९८९) आणि फिरोज पुनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ) यांनी सुरू केलेल्या या फाऊंडेशनच्या अनेक यशोगाथा आहेत जिथे लीला पुनावाला फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांनी यशाची शिखरे गाठली आहे आणि आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मोठे यश मिळवले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून एलपीएफ ने महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती जिल्हा, नागपूर शहर तसेच तेलंगणा मधील हैदराबाद जिल्ह्यातील १०,८०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे.
एलपीएफ पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये/विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय मुली उमेदवारांकडून ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मागवत आहे. बॅचलर ऑफ इंजीनियरींग/ टेक्नॉलजी (४ वर्ष). डिप्लोमा नंतरचे बॅचलर ऑफ इंजीनियरींग/ टेक्नॉलजी (3 वर्षे), बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) आणि बॅचलर ऑफ फार्मसी आदि शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून सुरू होणारे शिक्षण घेणार्या गरजू मुली यासाठी अर्ज करू शकतात.
शिष्यवृत्तीचे अर्ज या लिंकवर उपलब्ध आहे : https://www.lpfscholarship.com
अधिक माहितीसाठी कृपया अस्मिता शिंदे यांच्याशी संपर्क साधा – लँडलाइन नंबर: ०२० – २७२२४२६४ / ६५ , मोबाईल: ८६६९९९८९८१
ईमेल : lpfpunescholarship@lilapoonawallafoundation.com