पुणे: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत ‘ जागतिक आरोग्य दिना’ निमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशो. प्रशि. संस्था व क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले फांऊडेशन संयुक्त विद्यमाने व जिजामाता शासकीय रूग्णालय,पिंपरी चिंचवड ब्लड बँक,ASG eye hospital यांचा सहकार्याने ‘आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रहाटणी येथे सामाजिक समता सप्ताह अंतर्गत संपन्न झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा माजी महापौर माई ढोरे यांचा हस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांनी उपस्थित महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सक्षमीकरण याबाबत विचार या विषयावर मार्गदर्शन केले.
समतादुत प्रशांत कुलकर्णी यांनी नेत्र तपासणी शिबिराचे नियोजन व समन्वय केले तसेच समतादुत भारती अवघडे यांनी रक्तदान शिबिर व रक्त तपासणी शिबिराचे नियोजन व समन्वय केले.
तसेच पुणे जिल्हयात ठिकठिकाणी बाबसाहेबांचे महिला सक्षमीकरणबाबत विचार विषयावर व्याख्यान समतादूत अनिता दहीकांबळे, उषा कांबळे, किर्ती आखाडे यांनी आयोजित करून सामाजिक समता कार्यक्रम उत्साहात पार पाडले.
Read Time:1 Minute, 48 Second