महिला दिनानिमित्त श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
Views: 287
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 4 Second

पुणे :  श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त  ‘श्री यशस्वी रत्न सन्मान सोहळा 2022’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अभिनेत्री स्वाती हनमघर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राम बांगड, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सभासद ऍड. कमल सावंत, कृषी अधिकारी एस. एस. सावंत, सेजल इंटरनॅशनल अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अजिता सुर्वे आदी उपस्थित होते.

सन्मान सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष आहे. स्वेव युनिसेक्स स्पालोन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘जेंडर इक्वालिटी’ साधत महिलांच्या प्रगतीसाठी आग्रही असणारे व महिलांना सहकार्य करणाऱ्या पुरूषांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी बोलताना स्वाती हनमघर म्हणाल्या, महिलांमध्ये असलेली प्रतिभा व कलागुणांना वाव देण्यासाठी व एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महिला व पुरूष या दोघांनाही योग्य शिक्षण, मार्गदर्शन आणि मार्केटिंगची आवश्यकता आहे. प्रस्थापित क्षेत्रांबरोबरच बदलत्या काळाबरोबर नवीन क्षेत्रात महिलांना सक्षम करणे काळाची गरज आहे,  श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशन महिलांना वेगवगळ्या क्षेत्रातील शिक्षण, मार्गदर्शन आणि मार्केटिंगचे शिक्षण देवून महिलांना सक्षम बनवण्यासाठी कार्यरत आहे.

तसेच यावेळी श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशनच्या  सचिव अंकिता हनमघर, खजिनदार शिल्पा शेडे, विश्वस्त दर्शना गाडे, महेश चरवड, अक्षय कोठारी, पंकज भडाम आदी उपस्थित होते.सन्मान सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी सर्व सन्मानार्थीना गुलाबी रंगाचे फेटे बांधण्यात आले. तर प्रमाणपत्र आणि ई-नॅप्किनचा बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “महिला दिनानिमित्त श्री यशस्वी एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

  1. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Metropol Halı Karaca Halı Öztekin ve Selçuklu Halı Cami Halısı ve Cami Halıları Türkiye’nin En Büyük Cami Halısı Fabrikasıyız…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?