चिंचवड: साप्ताहिक माझी सोबतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “हिरकणी विशेषांक 2022” या दर्जेदार अंकाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या पत्नी व प्रसिध्द ट्रेकर सौ स्मिता पाटील, उपमहापौर हिरा उर्फ नानी घुले, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
चिंचवड येथील कै रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्जेदार विशेषांक प्रकाशित करण्याची परंपरा असणाऱ्या माझी सखी सोबती या साप्ताहिकाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ” हिरकणी विशेषांक 2022 ” प्रसिध्द करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या पत्नी सौ स्मिता पाटील उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, नगरसेविक अनुराधा गोरखे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेच्या अधिकारी सौ कुलकर्णी मॅडम यांनी केले