पुण्यासह या ‘आठ’ शहरांमध्ये विक्रीविना नऊ लाख घरे पडून
Views: 984
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 5 Second

पुणे : देशातील आठ मोठ्या शहरांत जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत विक्रीविना घरांच्या साठ्यात एक टक्का वाढ झाली आहे. या तिमाहीत ९,०१,९६७ घरे विक्रीविना राहिली आहेत. विकल्या न गेलेल्या घरांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण या आठ शहरांतून नव्या गृहप्रकल्पांची सुरुवात हे असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल क्रेडाय, कॉलिअर्स इंडिया आणि लायसेस फोरास या तीन संस्थांनी मिळून तयार केला आहे.

 

मागील चारही तिमाहींतील न विकल्या गेलेल्या घरांचा आढावा घेतल्यास ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या तिसऱ्या तिमाहीअखेर विक्रीविना ८,९४,१०० घरे होती. त्यात चौथ्या तिमाहीत एक टक्का वाढ झाली आहे. या आठ शहरांमध्ये चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) विक्रीविना सर्वाधिक ३२ टक्के घरे पडून असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली एनसीआर) मध्ये १८ टक्के घरे पडून आहेत. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागत असून, पुण्यात १४ टक्के घरे विक्रीविना पडून आहेत.

 

विक्रीविना घरांच्या संख्येत २०२०च्या दुसऱ्या तिमाहीपासून २०२१च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सातत्याने घसरण होत गेली. त्या वेळी अनेक जण घरून काम करीत होते. त्यामुळे मोठ्या घरांची गरज प्रकर्षाने वाढत होती. त्याच वेळी बँकांनी स्वस्त दरांत गृहकर्जे दिली. त्यामुळे घरांची विक्री सातत्याने वाढत गेली. याचा फायदा उठवण्यासाठी २०२२ या चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नव्या गृहप्रकल्पांची घोषणा केली. यामुळे पुन्हा एकदा विकल्या न गेलेल्या घरांच्या संख्येत वाढ झाली आहे.

 

विक्रीविना पडून असलेली घरे (जानेवारी ते मार्च २०२२)

शहर प्रमाण (टक्के) विक्रीविना घरे (संख्या)

हैदराबाद १४ ६८,२४३

अहमदाबाद ६ ७३,७६९

एमएमआर ४ २,९१,२६६

बेंगळुरू ५ ७०,९२७

चेन्नई ५ ७५,१६४

दिल्ली एनसीआर ३ १,५८,५६३

पुणे २ १,२३,६६५

कोलकाता १ ४०,३७०

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

19 thoughts on “पुण्यासह या ‘आठ’ शहरांमध्ये विक्रीविना नऊ लाख घरे पडून

  1. CellSpy mobile phone monitoring software is a very safe and complete tool, it is the best choice for effective monitoring of mobile phones. App can monitor various types of messages, such as SMS, email, and instant messaging chat applications such as Snapchat, Facebook, Viber, and Skype. You can view all the contents of the target device: GPS location, photos, videos and browsing history, keyboard input, etc. https://www.xtmove.com/how-to-see-what-someone-is-doing-on-their-phone-without-them-knowing/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?