निलेश देशमुख यांनी स्वतः ला दिलेलं चॅलेंज पूर्णही केलं आणि थाटात मार्च महिन्याच्या पगारही घेतला
Views: 1058
2 0

Share with:


Read Time:7 Minute, 38 Second

( सत्याच्या मार्गावर चालन्याचा फायदा म्हणजे तिथे गर्दी कमी असते- #guru_nilesh…)

बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी नावाच्या नाण्याची दुसरी बाजू कामचुकार अशीच दिसते किंबहुना असतेच पण याला अपवाद असलेले अधिकारीही यंत्रणेत आहेत आणि म्हणूनच प्रशासन नावाचा गाडा सुरू आहे
प्रशासकीय सेवेतील चपराशी ते वरिष्ठ अती वरिष्ठ अधिकारी अधिकारी ओळखीचे आहेत पण त्यातील काहीच अधिकारी समाजावर आपल्या कामाची छाप पाडू शकतात हे त्यांना अभ्यासताना लक्षात आले.

पिंपरी चिंचवड महापालिका तशी अजूनही श्रीमंतच आहे पण ही श्रीमंती कायम ठेवण्याच पहिलं श्रेय प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या कर दात्या नागरिकांचं आणि दुसर श्रेय कर बुडव्या नागरिकांच्या खिशातून नव्हे घशातून कर वसूल करणाऱ्या कर संकलन विभागाचं

हा विभाग कुठल्याही महापालिकेचा आर्थिक कना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी चरण्यासाठी कुरनही असतं म्हणा…
म्हणजे अमुक एखाद्या व्यक्ती किंवा संस्था कंपनीत किंवा महाविद्यालयाच्या आतील बाजूस महापालिका बांधकाम विभागाला न कळवताच मोठं मोठी बांधकामे करते,
त्याच प्रमाणे नदी काठी ,आरक्षित जागेवर ,हॉटेलच्या आत, पार्किंगच्या जागेत किंवा जिथे कुणाचं सहाजा-सहजी लक्ष जाणारं नाही अशा ठिकाणच्या उभारलेल्या मिळकती शोधणे आणि त्यावर कर आकारून तो वसूल करणे हे या विभागाचं काम
पण अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या प्रकारच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतात कारण अधिकाऱ्यांनी अशा बांधकामाकडे दुर्लक्ष केले तर कुणाचा तरी करोडो रुपयांचा कर वाचतो आणि त्यांना धनलाभ होतो …
दुर्लक्ष करण्याचं दुसरे कारण म्हणजे अशा मिळकती खूप श्रीमंत आणि राजकीय व्यक्तीच्या असतात किंवा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या असतात मग जीव किंवा नौकरी गमावण्याच्या भितीनेही अधिकाऱ्याकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं

मात्र जीवाची भीती वैगेरे फाट्यावर मारत कित्येक वर्षा नंतर म्हणजे अशोक मुंढे या ताठ कण्याच्या अधिकाऱ्यानंतर आणखी एक प्रमाणिक अधिकारी कर संकलन विभागात रुजू काय होतो आणि बघता बघता केवळ दोन महिन्यात कर ६० तक्के (६०० कोटी) कर वसुली देखील करतो, हे सारेच अचंबित करणारे होते कारण पिंपरी चिंचवड शहराने आत्ता पर्यंत एवढ्या वेगाने काम करणारा एकही अधिकारी पहिला नव्हता..मात्र देशमुख याला अपवाद ठरले

निलेश म्हणतात एकदा चांगल्या गोष्टी करायचं ठरवलं की आपोआप नियतीही साथ देते
शेवटी काम करायचं सेवा द्यायची म्हणून तर आपण प्रशासनात आलोय ही बाब विसरून न जाता काम केलं की आपण सगळ्यांच्या विश्वासास पात्र होतो आणि आपल्याशी हजारो हात जोडले जातात त्यांचे हे विचार एखाद्या संवेदनशील लेखक किंवा कवी प्रमाणे वाटतात नाहीं का..?
पण ते कवी आणि लेखकही आहेत आत्ता पर्यंत निलेश देशमुख यांची स्वानुभववावर लिहलेले
चिरंतनाची सनातन मुद्रा, भयाची वंशसूत्रे,आणि खचलेल्या चौथया मितीतून ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. (त्यांच्या लेखनाच्या समरूद्धीवर पुन्हा कधीतरी लिहीन)

इस्लामपूर मध्ये काम करत असताना निलेश यांना ६ वर्ष मिळाली, सरकारी अधिकाऱ्यांना तीन वर्षा पेक्षा अधिक काळ राहता येत नाही पण इस्लामपूर मधली ६ वर्ष त्यांच्या प्रमाणिक पनाची पावती होती त्या ६ वर्षाच्या काळात त्यांनी तिथे १ लाख झाडे लावली त्यातील ७०,००० झाडे जगली आणि आज ते शहर सावली देणारा अधिकारी म्हणून देशमुख यांना ओळखते

सोलापूरच्या कसदार आणि किमयागार मातीतील निलेश देशमुख ,
पिंपरी चिंचवड महापालिकेतील पशुसंर्धन ,उद्यान, आकशचीन्ह परवाना आणि कर संकलन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
पैकी आकशचिन्ह परवाना म्हणजे शहरात जेवढी होर्डिंग्ज ,फ्लेक्स लागतात त्याचा कर वसूल करणे आणि दुसरा मालमत्ता कर वसूल करनारा कर संकलन विभाग या दोन विभागाचा संबंध थेट पैशाशी आहे आणि म्हणून इथे येणारा अधिकारी प्रामाणिकच असावा लागतो
निलेश देशमुखांनी आपला प्रमाणिकपना सिद्ध करत दोन्ही विभागातील कर वसूल करण्याचे रेकॉर्ड मोडीत काढले आणि कमी वेळात उच्चांकी महसूल गोळा करून दिला..
म्हणजे जो आकाश चिन्ह परवाना विभाग वर्षाला दोन_पाच कोटी वसूल करून द्यायचा तिथे या माणसाने या वर्षी तब्बल १२ कोटी वसूल करत महापालिकेच्या तिजोरीत भर घातली ….

पण हे करण्यासाठी देशमुख यांनी स्वतः ला एक चॅलेंज दिलं होत आणि ते जाहीरही केलं होतं
जर मी दोन्ही विभागातील कर वसुलीचे दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकलो नाही तर मार्च महिन्याचा पगार घेणार नाही …. असं ते चॅलेंज होतं” मग काय त्यांनी स्वतः ला दिलेलं चॅलेंज पूर्णही केलं आणि थाटात मार्च महिन्याच्या पगारही घेतला…
जिथे भल्या-भल्यांना करवसुली करताना घाम फुटला तिथे हा माणूस पगार घेणारं नाही असं जाहीर करून अनेकांना अंगावर घेतो आणि आपल उद्दीष्ट पूर्ण करतो ही बाब अनेकांचं धैर्य वाढवणारी ठरलीय

थोडक्यात काय तर प्रमाणिक असलं
की एवढा आत्मविश्वास येतोच आणि असा सकारात्मक आत्मविश्वास या माणसाकडे प्रचंड भरलेला आहे ….

– गोविंद अ. वाकडे

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “निलेश देशमुख यांनी स्वतः ला दिलेलं चॅलेंज पूर्णही केलं आणि थाटात मार्च महिन्याच्या पगारही घेतला

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?