भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान मध्ये  शेतकर्‍यांना  मदतीच्या दृष्टीकोणातुन  किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने किसान मेळाव्यात प्रदर्शित केले न्यु जनरेशन एनर्जी एफिशियंट पंप  
Views: 108
0 0

Share with:


Read Time:6 Minute, 51 Second

पिंपरी चिंचवड : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान 23 ते 27 मार्च 2022 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) ही आज  2.5 अब्ज डॉलरची किर्लोस्कर समूहाची प्रमुख कंपनीने शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी आज  न्यु जनरेशन एनर्जी एफिशियंट पंपांची सीरिज प्रस्तृत केली आहे. ज्याची घोषणा आज करण्यात आली.

केबीएलचे नुकतेच लॉन्च केलेले न्यु जनरेशन पंप अनेक प्रकारे कार्यक्षम आहेत. हे पंप शेतातील खुप खोल अश्या बोअरवेलमधून पाणी काढण्यास सक्षम आहेत, जेणेकरून पाण्याची पातळी एका विशिष्ट पातळीच्या खाली घसरली तरीही शेतकरी हे पंप वापरू शकतात जरी . या वैशिष्ट्यामुळे, या नव्या किर्लोस्कर पंपांचा वापर सिंचनासारख्या  त्या सेवांसाठी केला जाऊ शकतो जेथे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सामान्य पंपांना मर्यादा आहेत.किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या सह-व्यवस्थापकीय संचालीका रमा किर्लोस्कर म्हणाल्या. पंप बनवताना आम्ही नेहमीच शेतकर्‍यांचा फायदा लक्षात घेतला आहे. नवीन पिढीतील ह पंप प्रगत तंत्रज्ञानाने तयार केले जातात.  उत्कृष्ट अश्या या न्यु जनरेशन पंपांची रचना अश्या प्रकारे केली आहे ज्यामुळे हे पंप कमी उर्जेत उच्च कामगिरीस सक्षम आहे. आम्ही पुर्वीपासूनच एनर्जी एफिशिएंट पंपांचे उत्पादन करून शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी मदत करत आहोत आणि भविष्यातही करत राहु,  प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेले हे पंप उच्च कार्यक्षमा देतात व कमी ऊर्जा वापरतात. त्यामुळे, किर्लोस्करचे नवीन जनरेशन पंप सिंचनासाठी वापरले तर शेतकर्यांचे विजेचे बिल कमी होईल व त्यांचे बरेच पैसे वाचतील. इतर उत्पादकांच्या  पंपांच्या तुलनेत किर्लोस्कर पंप  दिर्घकालिन कार्यक्षम आहे ज्यामुळे कार्यक्षमतेत कोणतीही हानी होत नाही.बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सामान्य पंपांच्या तुलनेत किर्लोस्कर पंपांमध्ये ऊर्जेची बचत करण्याची आणि शेतकर्यांचे वीज बिल  20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची क्षमता आहे.
सिंचनासाठी योग्य पंप निवडल्याने एकूणच शेतकर्यांच्या समृद्धीला हातभार लागतो. त्यामुळे, शेतकरी, न्यु जनरेशन किर्लोस्कर पंपांवर अवलंबून राहू शकतात जे ऊर्जा-कार्यक्षम आहेत, आणि मोटार जळण्याची शक्यता कमी आहे . किर्लोस्कर पंपांनी एका शतकाहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आणि वापरकर्त्यांमध्ये ते पसंतीचे पर्याय बनले आहेत.
केबीएलच्या सबमर्सिबल पंप्समधील एक वैशिष्ट्य म्हणजे एडव्हान्स सँड-फायटर डिझाइन जे इतर उप्तादकांच्या पंपांमध्ये नाही. जेव्हा पंप खालून पाणी आणतो तेव्हा पाण्यासोबत वाळू येण्याची शक्यता  जास्त असते ज्यामुळे पंपांची कार्यक्षमता कमी होते आणि पंपाच्या घटकांची झीज वाढते.केबीएलच्या या प्रगत  तंत्रज्ञानामुळे वाळू बोअरवेलमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे झीज, पंप जॅमिंग होत नाही व पंपची कार्यक्षमता वाढवते  म्हणूनच हे पंप या श्रेणीत  सर्वोत्तम आहे.हे किर्लोस्कर पंप सर्व प्रकारच्या सिंचनासाठी जसे की ठिबक, स्प्रिंकलर आणि होसपाइपसाठी वापरता येतात. किर्लोस्कर पंप शेतकर्यांच्या गरजेनुसार सर्व आकाराच्या जमिनी आणि जलसाठ्यांसाठी योग्य आहेत.
शेतातील रोपांच्या वाढीसाठी वेळेवर सिंचन हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे, किर्लोस्कर ब्रदर्सचे पंप  विश्वासार्ह, अत्यंत कार्यक्षम आणि व कमी देखभाल खर्चाचे पंप आहेत जे अत्यंत कमी ऊर्जा वापरतात .
केबीएलचे मिनी-सिरीज पंप थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टरसह उच्च कार्यक्षमता आणि ऊर्जा बचत डिझाइनसह बनवले जातात. या पंपाची मोटर 180-240 व्होल्टमधील व व्होल्टेज चढउतारांना तोंड देण्यासाठी , उच्च/कमी व्होल्टेजमुळे मोटार जळण्याची शक्यता कमी करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. हे पंप शेतीमधील लघु सिंचन आणि घरगुती वापरासारख्या इतर अनेक क्षेत्रांसाठी आहेत.
नव्या वैशिष्ट्यांसह उत्पादित, हे पंप 24  महिन्यांची वॉरंटी देतात. या कालावधीत कोणतीही हानी झाल्यास विनाशुल्क दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग दिली जाते. साधारणपणे, किर्लोस्कर पंप व्यवस्थीतपणे  चालवले आणि हाताळले गेले तर अनेक वर्षे कोणत्याही देखभाल खर्चाशिवाय सर्व परिस्थितीमध्ये सेवा देतात.
या नवीन सिरीज पंपांमध्ये इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यात हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाइन आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना  नक्कीच मदत होईल.

————-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?