राष्ट्रवादीचे भूपेंद्र मोरे यांच्या चार दिवसांच्या लढाईला यश; महापालिका प्रशासनाकडून सगळ्या मागण्या मान्य
Views: 747
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 10 Second

पुणे : गेल्या चार दिवसापासून झोपलेल्या प्रशासनाला अखेर जाग आणि राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण संपुष्टात आले. सर्व गोष्टींची पूर्तता प्रशासनाने लिखित स्वरूपात दिल्याने आंदोलन पूर्ण झाल्याची मोरे यांचे बंधू भूषण मोरे यांनी दिली.

पाणी, ड्रेनेज, रस्ता या मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या असून कचरा समस्येवर देखील तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करता आहे. पथ विभागाने नऱ्हे मुख्य रस्त्याची डागडुजी व अंतर्गत रस्ते तातडीने करण्याचे मान्य केले आहे. यामुळे नऱ्हे मुख्य रस्त्याची झालेली चाळण काही प्रमाणात भरून येण्यास मदत होणार आहेत. नालेसफाई व ड्रेनेज सफाईसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार असून टेंडरद्वारे सादर कामे करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात दिले.

उपोषण सोडताना राष्ट्रवादी खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर, माजी सभापती प्रभावती भूमकर, उपाध्यक्षा राजेश्वरी पाटील, स्वाती पोकळे, शरद दबडे, सुप्रिया भूमकर, भूषण मोरे, सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

मागण्या मान्य केल्यामुळे दिलासा : भूपेंद्र मोरे

नऱ्हे- आंबेगाव परिसरातील मूलभूत समस्या गंभीर बनल्या होत्या. कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. नऱ्हे गावातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध केले नसल्यामुळे नागरिकांना पालिकेच्या कर भरण्याबरोबर पाण्याच्या टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. उपोषणामुळे प्रशासनाने बऱ्याच मागण्या मान्य केल्यामुळे दिलासा मिळाला आहे, असे भूपेंद्र मोरे म्हणाले.

 पाण्याची पहिली मागणी तातडीने मान्य

प्रशासनाने तातडीने दरोडे – जोग येथे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या टाकीत पाण्याचा टँकर टाकताना उपोषणातील पहिली मागणी मान्य केली. यामुळे प्रशासनातील किमान काही अधिकारी सजग आहेत, असे म्हणता येवू शकेल, असा विश्वास भूषण मोरे यांनी व्यक्त केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?