राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्यावरण सेल पिंपरी चिंचवडचा नागरिकांच्या सोयीसाठी ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रम
Views: 131
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 3 Second

पिंपरी चिंचवड:  पुर्णानगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्यावरण सेल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आणि चिंचवड पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिस आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे,दोन दिवसीय शिबीर शिर्के बिल्डिंग नं. 15 पूर्णा नगर येथे राबविण्यात येत आहे सदर शिबिराचे उद् घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा प्राध्यापिका सौ. कविताताई संदेश अल्हाट यांच्या हस्ते व मा नगरसेवक श्री.नारायण बहिरवडे ,पर्यावरण शहराध्यक्ष श्री.विनय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरवात मान्यवर व हरिनारायण शेळके,  कल्याण वाणी श्रीनिवास लोढा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा अंजुषा नेर्लेकर सांगवी पिंपळे गुरव प्रभाग अध्यक्ष जावेद शेख, ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर ज्येष्ठ नागरिक नागरिक संघाचे अध्यक्ष तसेच स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे  हरि नारायण शेळके  भरत मालवी, सुभाष आहेर,  विक्रम गोते, राहुल बडगुजर श्री माऊली शेळके  रोहित चव्हाण (सामाजिक कार्यकर्ता) .अदित गुजरे . संदीप आल्हाट (सामाजिक कार्यकर्ता) तसेच सविताताई राणे.रंजना आहेर, कल्पना घोडे, मंदा भोंडवे , कुसुम उदार .सोनाली गोते . कृणाली बडगुजर .जया गायकवाड .निवेदिता सुनिल कदम. प्रिया झोपे श स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्ष . अर्चना तौंडकर तसेच स्थानिक नागरिक व महिलांच्या उपस्थितीत शिबीर उद् घाटन कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा  कविता म्हणाल्या की,पोस्ट सारख्या लोक उपयुक्त योजना ज्योती सारख्या कार्यकर्त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवत आहेत तसेच मा. नगरसेवक नारायण बहिरवडे म्हणाले की, नागरिकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता नेहमीच तत्पर असतो तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नेहमीच करत असतो. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ज्योती जाधव यांनी केले प्रास्ताविक करत असताना त्यांनी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती दिली पर्यावरण अध्यक्ष  विनय शिंदे यांनी नागरिकांना या लोक उपयुक्त पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून आभार प्रदर्शन केले.
शिबिराचे आयोजन व नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पर्यावरण सेल पिंपरी चिचंवड शहर सरचिटणिस व प्रवक्त्या सौ.ज्योती जाधव यांनी केले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?