Read Time:1 Minute, 10 Second
पिंपरी चिंचवड: शीतला देवी संस्थान पिंपरी आणि ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर तर्फे नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला आणि चैतन्य देवींच दर्शन घेतलं.
विशेष ब्रह्माकुमारीज पिंपरीच्या संचालिका सुरेखा दीदींचा सत्कार आणि सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. सुरेखा दीदींनी शितलादेवी संस्थानचे अध्यक्ष तसेच प्रताप मित्र मंडळ यांचे आभार मानले व त्यांना स्मरणिका भेट केली.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मराठी फिल्म अभिनेत्री गायत्री बनसोडे, गणेश वाघेरे प्रताप मित्र मंडळ ग्रुप, ब्रह्माकुमारी संचालिका सुरेखा दीदी, विद्या बहन, रूपाली बहन, अपर्णा बहन या सर्वांची आणि सर्व ग्रुप ची लाभली.