पिंपरी चिंचवड : मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेल “नूतन कार्यकारिणी व नियुक्ती पत्र वाटप” अर्बन सेल प्रदेशाध्यक्ष खासदार ॲड.वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला निरीक्षक शितलताईं हगवने, तसेच महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व त्यांच्या न्याय हक्कासाठी अर्बन सेलच्या माध्यमातून आपण सर्वजण कशाप्रकारे महत्वाची भूमिका बजावून या सेलच्या दहा विभागांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संघटनेच्या माध्यमातून नागरिकांसाठी सदैव तत्पर राहून सर्व समावेशक कामगिरी बजावू असा निर्धार त्यांनी यावेळी केला. तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यावेळी म्हणाले की, अर्बन सेल पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचे काम भविष्यात आम्ही करून दाखवू, असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्याध्यक्ष फजल शेख, नगरसेवक मयुर कलाटे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, अर्बन सेल निरिक्षक नितिन जाधव, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्षा मनीषा गटकळ, पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील, उपाध्यक्ष धनंजय भालेकर, झोपडपट्टी सेल महिला अध्यक्ष सुनीता अडसूळ, मीरा कुदळे, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, ओबीसी महिला अध्यक्षा सारिका पवार, महिला संघटक पल्लवी पांढरे, सरचिटणीस अभिजीत आल्हाट, सरचिटणीस सुदाम शिंदे, कल्पाना आल्हाट, मेघा पवार इत्यादींसह अनेक नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थि्तीत होते.