पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा
Views: 2288
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 26 Second

पुणे, दि. ३१: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तत्पूर्वी डॉ.देशमुख यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, भाऊसाहेब गलांडे, प्रविण साळुंके, भाऊसाहेब गलांडे, रोहिणी आखाडे, वनश्री लाभशेटवार, सुरेखा माने, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?