नाशिक: एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत मिळालं कोट्यवधीचं घबाड, विशेष म्हणजे पैशांची मोजणी अद्यापही सुरुच
Views: 456
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 55 Second

नाशिक, 26 ऑगस्ट : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (25 ऑगस्ट) धडाकेबाज कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने काल एका बड्या अधिकाऱ्याला तब्बल 28 लाखांची रोख रकमेची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. एसीबीच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्यानंतर या अधिकाऱ्याकडे शंभर कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याची भीती वर्तवली जात होती. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे एसीबीने आतापर्यंत केलेलेल्या कारवाईत जवळपास दीड कोटींपर्यंतची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एसीबी अधिकाऱ्यांकडून अजूनही तपास सुरु आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना अटक केली होती. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी एका ठेकेदाराकडे तब्बल 28 लाखांची लाच मागितली होती. दीड कोटी रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. अखेर एसीबी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करत बागुल यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

लाचखोर अधिकारी दिनेश कुमार बागुल यांना काल अटक केल्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी आज त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने पुरावे पाहून त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस आणि एसीबी अधिकाऱ्यांचा तपास सुरुच आहे. विशेष म्हणजे बागुल यांना अटक केल्यानंतर अवघ्या 24 तासात एसीबी अधिकाऱ्यांना बागुल यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या घरातून पैशांचं मोठं घबाड सापडलं आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांची पैशांची मोजणी अजूनही सुरुच आहे.
एसीबी अधिकाऱ्यांना बागुल यांच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98 लाख 63 हजार 500 रुपये रोख रक्कम मिळाली आहे. तर पुण्यातील घरातून 45 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 44 लाख 3 हजार 500 रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजूनही इतर लॉकर्स आणि मालमत्तेची तपासणी आणि मोजदाद सुरूच आहे.

नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या फाईली पडून असतात. नाशिकचं आदिवासी विकास भवन हे फक्त नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण राज्याचं आहे. इथूनच सर्व राज्यातील आदिवासी विकास विभागाचं कामकाज चालतं.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?