आमदार महेश लांडगे यांची श्रीराम नवमीनिमित्त शहरात ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती
Views: 859
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 32 Second

पिंपरी चिंचवड: प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरूषोत्तमता यासह अहंकारी प्रवृत्तीचा संहार करणारा ‘राम’ प्रत्येकाच्या मनात असावा. १४ वर्षे वनवास सहन केल्यानंतर ‘रामराज्य’ निर्माण करणारा योद्धा श्रीराम हे तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवडमध्ये श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीसह विविध संस्था संघटना आणि रामभक्तांनी मोठ्या दिमाखात शोभा यात्रा, पाळणा, गीत रामायण, रामकथा, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आमदार महेश लांडगे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना भेट दिली. दुचाकी रॅली, शोभा यात्रामध्ये सहभागी होत रामभक्तांसोबत उत्सव साजरा केला.
महेश लांडगे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोद्धेतील राम मंदिर उभारणीला दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे भाजपा काळात अयोद्घेत भव्य राम मंदिर उभारण्याचे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न साकार होत आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड काळात रामनवमी साजरी करता आली नाही. मात्र, यंदा निर्बंध हटवल्यामुळे रामनवमी उत्साहात साजरी झाली, याचे समाधान वाटते.
****
मोशी येथे दुचाकी रॅली…
मोशी येथील दुचाकी रॅलीचा शुभारंभ आमदार लांडगे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रभूरामचंद्र यांना वंदन करण्यात आले. तसेच, उपस्थित रामभक्तांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे यांच्यासह स्थानिक नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जाधववाडी, रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज, मोशी- देहुरस्ता, बोऱ्हाडेवाडी येथील रामायण मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला.

आमदार महेश लांडगे यांची श्रीराम नवमीनिमित्त शहरात ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती

इंद्रायणीनगरमध्ये दिवसभर कार्यक्रम…
इंद्रायणीनगर येथे विविध संस्था-संघटनांच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधी कार्यक्रम घेत रामभक्तांची मने जिंकली. यावेळी परिसरातील सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपासाई फाउंडेशनचा लक्षवेधी कार्यक्रम…
भोसरीतील कृपासाई फाउंडेशनतर्फे दरवर्षी राम जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांत कोविड परिस्थितीमुळे राम जन्मोत्सव साजरा करता आला नाही. ढोल-ताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, शोभायात्रा असा रंगतदार कार्यक्रम झाला. यावर्षी फाउंडेशनचे प्रदीप पवार यांनी लक्षवेधी कार्यक्रम घेतले. फाउंडेशनचे सोमेश काकडे, आनंद लोणकर, गणेश कंद, कल्पेश माने, दत्ता गव्हाणे, अजित गव्हाणे, सम्राट फुगे, गणेश गवळी, तुषार भुजबळ, अमोल कविटकर, सागर पडोळे आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?