
पुणे: ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व श्रीमंत राजे मल्हारराव होळकर ट्रस्ट पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्याकडून राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील तसेच सामाजिक शैक्षणिक चळवळीतील प्रतिष्ठित मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
धनगर जमातीतील एसएससी व एच एस सी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या तसेच कला क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून पालकांचे समाजाचे नाव शहराच्या राज्याच्या व देशाच्या पटलावर कोरलेल्या खेळाडू कलाकार अहिल्यारत्न एमबीए मेडिकल अभियांत्रिकी व पत्रकारिता तसेच विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या धनगर जमातीतील बांधवांच्या गुणवत्तेचे मेहनतीचे प्रतिष्ठित समाज बांधवाकडून मान्यवराकडून भरभरून कौतुक करण्यात आले व प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देऊन विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य आत्मविश्वास द्विगुणित केला व पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस भरपूर शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध लेखक तथा वक्ते प्रा. रवींद्र कोकरे व ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रवीण जी काकडे व मान्यवरांनी धनगर जमातीतील सद्यस्थितीचे राजकारणातील प्रशासनातील अनेक शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती विषयी मार्गदर्शन केलेआणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन प्रशासनात यावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनंजय माने सर यांनी केले. तसेच महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष श्री .महावीर काळे सर यांनी प्रास्ताविक केले.