‘रुपी’ बँकेचे विलिनीकरण करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना साकडे
Views: 275
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 50 Second

पुणे:  पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, असे साकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना घातले. रुपीच्या विलिनीकरणाबाबत आरबीआयच्या गव्हर्नरला योग्य ते निर्देश दिले असल्याचे कराड यांनी सांगितले.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर दौ-यावर असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज (शनिवारी) भेट घेतली. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याची विनंती केली. त्यावर डॉ. कराड म्हणाले, सुधीर पंडीत यांच्यासमवेत आरबीआयच्या गव्हर्नरची भेट घेतली आहे. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे व त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय रुपी बँकेचे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत विलिनीकरण करण्याबाबत सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकुर यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यांनी देखील रुपी बँकेचे विलिनीकरण करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. तसेच अर्थ मंत्रालयामार्फत रुपी बँकेच्या साडेचार लाख खातेदारांचा विचार करुन बँक चालू करण्यासाठी अथवा विलिनीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले असल्याचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले.

रुपी बँकेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल – संदीप वाघेरे

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कष्टकरी, गोरगरीब नागरिकांचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकले आहेत. गेली आठ वर्षे रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. आता बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने बँक पुनरुज्जीवीत होऊ शकते. बँकेचे विलिनीकरण व्हावे किंवा पुन्हा चालू करावी यासाठी न्यायालयीन लढाईपासून सर्व स्तरावर मी प्रयत्न करत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बँकेच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बँकेचे विलिनीकरण किंवा बँक चालू करण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे रुपी बँकेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास वाटतो”.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “‘रुपी’ बँकेचे विलिनीकरण करा, नगरसेवक संदीप वाघेरे यांचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना साकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?