पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवारा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा
Views: 162
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 27 Second

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब जाधव, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, नांदेडचे जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे, मधुसूदन सोनवलकर, उद्योजक रमेश पाटील, युवराज माने, माजी सैनिक राजेंद्र मोरे, संपदा सहकारी बँकचे संचालक मल्लिकार्जुन सर्जे, तेलगे प्रोजेक्ट कंपनीचे निलेश तेलगे, उद्योजक राम चिंचोले, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड, जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकट गायकवाड, उत्तम टूल्सचे संचालक उत्तम तेलंगे, माजी गटनेते एकनाथ पवार, स्वातंत्र्य सैनिक भगवानसिंग गहेरवार यांच्या पत्नी चंदाताई गहेरवार, कॅप्टन नरेंद्र सिंह चव्हाण, कॅप्टन आमसिद्ध भिसे, कॅप्टन पदमसिंह सिकारवार, कॅप्टन राजाराम आंब्रे, कॅप्टन उमेश सिंग, कॅप्टन भास्कर आंब्रे, कॅप्टन वसंत इंगळे, राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ, , कार्यक्रमाचे आयोजक अरुण पवार, प्रकाश इंगोले, , दत्तात्रेय राठोड, शंकर तांबे, सत्यजित चौधरी, धनाजी येळकर पाटील गणेश सर ढाकणे, वामन भरगंडे, बालाजी पवार दत्तात्रय धोंडगे, अरुण कोल्हे, बळीराम माळी, बालाजी पांचाळ, किशोर पाटील, सतीश काळे, जीवन बोऱ्हाडे, सुभाष दराडे, धनाजी येळकर पाटील, हनुमान घुगे, नितीन चिलवंत, अण्णा मोरे, प्रशांत फड, अलकाताई जोशी, दीपक साळुंखे, विशाल चव्हाण, अमोल बोरुडे, कैलास सानप, श्रीमंत जगताप, शिवाजी डोंगरे, किशोर आटरगेकर, अनिताताई पांचाळ, उमेश उगिले, दिनेश पांढरे, राजेंद्र कुमार, रमेश जाधव, गोपाळ माळेकर, माधव मनोरे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पिंपरी चिंचवडमधील व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये प्राचार्य डॉ. मनोहर पाटील (शैक्षणिक पुरस्कार), बाळासाहेब साळुंखे (गुणवंत कामगार पुरस्कार), जगन्नाथ माने (दुर्गरत्न पुरस्कार), खंडूदेव पठारे (सामाजिक पुरस्कार), दयानंद पोटे (उद्योग पुरस्कार), विकास वीर (युवा गौरव पुरस्कार), संतोष खवळे (युवा गौरव पुरस्कार), मुक्ताताई चिंचोरे (उद्योग पुरस्कार), विजय वडमारे (युवा गौरव पुरस्कार) आदींचा समावेश आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मंचक इप्पर म्हणाले, की मराठवाडा मुक्तीसंग्रामाला इतिहासात फारसं स्थान मिळालेलं नाही. भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यातही पारतंत्र्य काय असते, हे मराठवाडा वासियांनी अनुभवले आहे. त्यामुळे लोकांच्या समोर इतिहास यायला हवा. गुलामी मानसिकतेतून अनेकजण अद्याप बाहेर पडलेले नाहीत. हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा चांगला आहे. मराठवाड्यातील संघटना समन्वयाने काम करीत आहेत, या संघटनांनी ठोस निर्णय घेऊन काम केल्यास येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. मराठवाड्याचा कायापालट करण्याची क्षमता या संघटनांमध्ये आहे.
डॉ. गजानन व्हावळ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची यशोगाथा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक किरण गहेरवार यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?