
Views: 59
Read Time:1 Minute, 13 Second
पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट , महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालय व वसंतराव सखाराम सणस कनिष्ठ महाविद्यालय, धायरी येथे महाराष्ट्र शाळकरी मुलींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले तसेच यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला या मुलींना सॅनिटरी पॅड देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ९३५ शाळकरी मुलींना लाभ मिळाला असून भविष्यात हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा आयोगाचा मानस आहे.