महाराष्ट्र केसरी : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील नवा ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! मुंबईचा विशाल बनकर पराभूत
Views: 146
2 0

Share with:


Read Time:5 Minute, 12 Second

सातारा: महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला व ४५ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते
१९६१- औरंगाबाद- दिनकर दह्यारी
१९६२- धुळे- भगवान मोरे
१९६३- सातारा- स्पर्धा रद्द
१९६४- अमरावती- गणपत खेडकर
१९६५- नाशिक- गणपत खेडकर
१९६६- जळगाव- दिनानाथ सिंह
१९६७- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
१९६८- अहमदनगर- चंबा मुतनाळ
१९६९- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
१९७०- पुणे- दादू चौगुले
१९७१- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
१९७२- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
१९७३- अकोला- लक्ष्मण वडार
१९७४- ठाणे- युवराज पाटील
१९७५- चंद्रपूर- रघुनाथ पवार
१९७६- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
१९७७- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
१९७८- मुंबई- आप्पासाहेब कदम
१९७९- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
१९८०- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
१९८१- नागपुर- बापू लोखंडे
१९८२- बीड- संभाजी पाटील
१९८३- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
१९८५- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
१९८६- सोलापूर- गुलाब बर्डे
१९८७- नागपुर- तानाजी बनकर
१९८८- अहमदनगर- रावसाहेब मगर
१९८९- वर्धा- अनिर्णित
१९९०- कोल्हापूर- अनिर्णित
१९९१- अमरावती- अनिर्णित
१९९२- पुणे- आप्पालाल शेख
१९९३- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
१९९४- अकोला- संजय पाटील
१९९५- नाशिक- शिवाजी केकान
१९९६- स्पर्धा रद्द
१९९७- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
१९९८- नागपुर- गोरखनाथ सरक
१९९९- पुणे-  धनाजी फडतरे
२०००- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
२००१- नांदेड- राहुल काळभोर
२००२- जालना- मुन्नालाल शेख
२००३- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
२००४- वाशी- चंद्रहास निमगिरे
२००५- इंदापूर, पुणे- सईद चाउस
२००६- बारामती, पुणे- अमोल बुचडे
२००७- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
२००८- सांगली- चंद्रहार पाटील
२००९- सांगवी, पुणे- विकी बनकर
२०१०- रोहा, रायगड- समाधान घोडके
२०११- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
२०१२- गोंदिया- नरसिंग यादव
२०१३- भोसरी- नरसिंग यादव
२०१४- अहमदनगर- विजय चौधरी
२०१५- नागपुर- विजय चौधरी
२०१६- वारजे, पुणे- विजय चौधरी
२०१७-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
२०१८- जालना- बाला रफिक शेख
२०१९- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
२०२२- सातारा- पृथ्वीराज पाटील

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?