पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच नऊवारी नार तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी मराठमोळी सौंदर्यवती स्पर्धा प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे 9 जुलै रोजी संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनीताई चिंचवडे, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रदीप देशमुख, सिनेकलाकार सिद्धी पाटणे, चेतन मस्के, डॉक्टर बाळासाहेब खेंडके, शरलीन चित्रकार, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेमध्ये शहरातील जवळपास 125 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यामधून महाराष्ट्राची नऊवारी नार हा किताब रीना स्वामी यांनी जिंकला तर महाराष्ट्र आयकॉन शशांक जनीरे हे विजेते ठरले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतीक्षा डान्स अकॅडमी यांच्या गणेश वंदनेने करण्यात आली.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे
>मिस कॅटेगरी
शिवानी माने विजेती
जया नलावडे प्रथम, साक्षी ढाकोल द्वितीय
>मिसेस कॅटेगिरी
रीना स्वामी विजेता ,
प्रियंका थोरात प्रथम, नयना देवकर द्वितीय, प्रतिभा रुपनवर तृतीय
>जेन्ट्स कॅटेगरी
शशांक जनीरे विजेता ,
निखिल नाईकवाडे प्रथम, विजय जोगदंड द्वितीय
> किड्स कॅटेगिरी मुली
सेजल मानकर विजेती
रेहांशी पाटील प्रथम पूर्वी दाभणे द्वितीय
> किड्स कॅटेगरी मुले
प्रतीक इंगळे विजेता ,
सिद्धेश चौधरी प्रथम, प्रियांतुष भोईर द्वितीय
यासह अनेक विजेत्यांना विविध पारितोषिके देण्यात आली
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ऋषिकेश पाटील चंद्रमुखी चे सहनिर्माते, मयुरेश महाजन सिने अभिनेते व मॉडेल, व विजया मानमोडे यांनी केले
कार्यक्रमाची शोभा आंतरराष्ट्रीय लावणी सम्राट किरण कोरे यांच्या लावण्यांच्या भारदार कार्यक्रमांनी वाढवली
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नऊवार नार, फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, डिवाइन क्रिएशन व प्रतिक्षा इंगळे यांनी केले.
या सर्व कार्यक्रमातील मॉडेल यांचा मेकअप शमा धुमाळ क्लिओपात्रा ड्युटी इन्स्टिट्यूट यांच्या टीमने केला.
सर्व मोडेल यांना ज्वेलरी कृष्णाई पर्ल शॉपी यांनी दिली. विजेत्या महिलांना पैठणी साडी शंभो सिल्क अॅंड साडी यांच्यावतीने देण्यात आली.
या सह संयोजक म्हणून चैतन्य फुड्स व साई श्रद्धा लेडीज शॉपी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन चैताली नकुल भोईर व यांनी केले.
उपस्थित प्रेक्षक महिलांना एक ग्रॅम सोन्याची नथ व गिफ्ट हम्पर भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी पाटणे व चेतन मस्के यांनी केले
आभार नकुल भोईर यांनी मानले.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटला.