किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून मुलाच्या कंपनीसाठी जमीन मिळवली – संजय राऊत
Views: 228
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 51 Second

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीचे प्रमुख राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीसाठी जमीन मिळवली, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. जून २०१५ मध्ये किरीट सोमय्या  यांनी एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये किरीट सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. ऑक्टोबर २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एमएमआरडीएला पत्र लिहले होते. यामध्ये HDIL कंपनीला १ कोटी चौरस फूट व्यावसायिक जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचा आरोप केला होता. या जमिनीची किंमत ५००० कोटी रुपये असल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या सातत्याने एकापाठोपाठ एक तक्रारी करत होते. त्यावेळी किरीट सोमय्या खासदार होते. पण त्यांनी या सगळ्याविरोधात एकदाही केंद्रीय तपासयंत्रणेकडे तक्रार केली नाही, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

त्यानंतर २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले. त्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली. त्यानंतर निकॉन इन्फ्रास्ट्रक्टरला ५१६८ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकसत करण्याचे अधिकार मिळाले. हे अधिकार राकेश वाधवान यांच्याकडून विकत घेण्यात आले होते. किरीट सोमय्या यांचा फ्रंटमॅन देवेंद्र लधानी यांच्या साई रिधम कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाले. वसईमध्ये साई रिधम कंपनीच्या जमिनीवर निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला दोन प्रकल्प उभारण्याची परवानगी मिळाली. या जमिनीचे मूळ मालक राकेश वाधवान होते. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणात किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले असतानाही त्यांच्या मुलाचे राकेश वाधवान यांच्या कंपनीशी संबंध कसे असू शकतात? किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून ही जमीन मिळवून दिली होती का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

 

तसेच या सगळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. आता नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरी तो भविष्यात दाखल होऊ शकतो. मार्क माय वर्डस, बाप-बेटे हे काही झाले तरी जेलमध्ये जातीलच, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

3 thoughts on “किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून मुलाच्या कंपनीसाठी जमीन मिळवली – संजय राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?