Kayam vajanat : महाराष्ट्र पोलिसांवरील रत्नदीप कांबळेंच ‘भाऊ आपला कायम वजनात’ गाण सोशल मिडियावर व्हायरल*
Views: 1472
6 2

Share with:


Read Time:3 Minute, 33 Second

पुणे: आशय प्रधान आणि ठेका धरायला लावणारी गाणी ही प्रदर्शित होताच काही तासांतच व्हायरल होतात. नुकतेच Rex studio रेकॉर्ड लेबल प्रस्तुत व संचालक रत्नदीप कांबळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘भाऊ कायम वजनात’ हे गाणं सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाण महाराष्ट्र पोलिस यांना समर्पित असून यामध्ये रत्नदीप कांबळे यांनी इंस्टाग्राम रिल्स वरील कलाकार दीपक गीते आणि टीम’ ला संधी दिली आहे.

यापूर्वी रत्नदीप कांबळे यांची ‘अहो शेठ लई दिसानं झालीया भेट लावणी ,अंगार भंगार नाय र्रर्रर्र, विठू माउली, लावा ताकत अशी अनेक गाणी तूफान व्हायरल झाली आहेत. ‘भाऊ कायम वजनात’ हे गाणं ते घेऊन आले आहेत. या गाण्याची संकल्पना आणि संगीत हे रत्नदीप कांबळे यांच आहे. बोल कमलेश गायकवाड यांचे असून गायक मधुर शिंदे यांनी हे गाण गायलं आहे.

या गाण्याविषयी बोलताना रत्नदीप कांबळे म्हणाले, तरुणाईला भावतील अशी अनेक गाणी आम्ही Rex studio रेकॉर्ड लेबल अंतर्गत प्रस्तुत केली आहेत. तसेच कोरोना काळानंतर लावणी विश्वात लावणी कलाकारांना एक आगळी वेगळी लावणी ‘अहो शेठ लई दिसानं झालीया भेट’ या गाण्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही ‘भाऊ आपला कायम वजनात’ हे गाण घेवून आलो आहोत. हे गाण महाराष्ट्र पोलिसांना समर्पित असून यातील कलाकार हे इंस्टाग्राम वरील ‘रील स्टार’ आहेत. सोशल मिडियावर हे गाण व्हायरल झाल असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Rex studio रेकॉर्ड लेबलच्या वाटचाली बद्दल बोलताना रत्नदीप कांबळे म्हणाले, संगीताची पार्श्वभूमी नसताना केवळ संगीताची आवड म्हणून मी संगीत शिकायला सुरूवात केली. सुरूवातीला डी जे रेक्स म्हणून अनेक गाणी रिमिक्स केली. त्यानंतर ‘Rex studio रेकॉर्ड लेबल’ची स्थापना केली. अवघ्या सहा वर्षांच्या प्रवासात Rex studio ने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या प्रवासात गायक मिलिंद शिंदे, उत्कर्ष शिंदे,गीतकार राहुल सुर्यवंशी,मधुर शिंदे, सौरभ साळुंखे, सोनाली सोनावणे अशा दिग्गज गायकांसोबत काम केले. तसेच सौरभ देशपांडे, ऋषी बी,आनंद पायाळ आणि अनुराग कांबळे यांची साथ मिळाली.सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट वर काम चालू असून लवकरच चित्रपट, वेब सिरिज मधेही प्रेक्षकांना गाणी ऐकायला मिळतील.

Happy
Happy
32 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
64 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
4 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

9 thoughts on “Kayam vajanat : महाराष्ट्र पोलिसांवरील रत्नदीप कांबळेंच ‘भाऊ आपला कायम वजनात’ गाण सोशल मिडियावर व्हायरल*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?