धनगर समाजाच्या सर्वच मागण्या मान्य करण्यास प्रशासनाला भाग पाडण्यासाठी धनगर समाजाने सर्व प्रथम संघटित होणे ही काळाची गरज – प्रवीण काकडे
Views: 104
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 24 Second

उस्मानाबाद: आपण आपल्या आरक्षणासह धनगर समाजाच्या सर्वच मागण्या मान्य करण्यास प्रशासनाला भाग पाडू त्यासाठी धनगर समाजाने सर्व प्रथम संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे मत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी उस्मानाबाद येथे धनगर समाज जनजागृती आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ मराठवाडा विभाग व उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने धनगर समाज जनजागृती समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव व कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार  उस्मानाबाद येथील जत्रा फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे हे होते तर मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष अरविंद पाटील, डॉ. गोविंद कोकाटे, डॉ. संतोष पाटील, डॉ. विनोद बर्वे, डॉ. राजेश थोरात, प्रा. सोमनाथ लांडगे, पिंपरी चिंचवड चे शहर अध्यक्ष महावीर काळे, सुमित्रा गोरे, जनशुभदा फाऊंडेशन चे सोमनाथ गुड्डे ,संजय कवितके, हिराकांत गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय खताळ यांनी केले.यावेळी पाचवी नवोदय, दहावी-बारावी, नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या धनगर समाजातील 30 विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर कोराना काळात गाव परिसरात उत्कृष्ट व मोलाचे कार्य करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आशा कार्यकर्त्या व समाज सेवकांचा ही कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले तर कोरोना काळात वृतपत्राच्या माध्यमातुन जनजागृती करणाऱ्या राजाभाऊ वैद्य, अमोल गाडे, आकाश नरोटे व प्रशांत सोनटक्के या पत्रकार बांधवाना ही कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित आले. यावेळी डॉ. अर्शद रजवी, महावीर काळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. गोविंद कोकाटे, सोमनाथ गुड्डे, राम जवान, रंजना दाणे, सुमित्रा गोरे व सुनील बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सकल धनगर संघटित व्हावा यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय समारोप करतांना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण काकडे यांनी उपस्थित समाज बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करीत हे जन जागृती अभियान जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सुरूच राहणार असल्याचे ही सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे, उपाध्यक्ष अरविंद पाटील, जिल्हाध्यक्ष संजय खताळ, मोहन रत्ने, संजय परसे, विशाल थोरात, रविकांत शिंगाडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार अरविंद पाटील यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?