पुणे: पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादे मल्टिपल व्हिजन घेवून मीडिया हाऊस चालवणे हे खूपच जबाबदारीचे काम आहे पण सद्याची माध्यमे खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ? असा मोठा प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यासाठी सर्वप्रथम माध्यमांनी अधिकारांच्या किंवा सत्तेच्या दुरूपयोगाला थांबवण्याची गरज आहे,अशी अपेक्षा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
पुण्यातील आर्यन्स गृप ऑफ कंपनीजच्या नॅशनल चॅनल न्युज अनकट,मराठी सांस्कृतिक व मनोरंजन वाहिनी स्वरंग तसेच ओटीटी दुनियेच्या सॉल्ट पिक्च अशा तीन माध्यम समुहाच्या एकत्रित मिडिया हाऊसच्या कॉर्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ मुंबई – बंगलोर हायवेवर बावधन येथे आज १३ मे रोजी झाला. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ना.मुंडे माध्यमांसमोर बोलतांना पुढे म्हणाले की,सध्या माध्यमांचा वापर एक सत्ताकेंद्र किंवा अधिकार केंद्र म्हणून सर्रास केला जातो.कोणत्याही देशांत लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा तिथली माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष असतात.काही निष्पक्ष माध्यमे प्रथेप्रमाणे आपल्या देशातही आहेत परंतु, पूर्वग्रहदूषितता आणि पक्षपातीपणाने त्यांनाही ग्रासले
असल्याची जाहीर टीका त्यांनी केली.दरम्यान,सद्याचा मिडिया कमकुवत झालेला दिसतो. म्हणूनच आजच्या माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची व लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी जागल्याची भूमिका प्रभावीरित्या पार पाडण्याची गरज आहे.त्यासाठी आर्यन्स मिडिया हाऊसने निःपक्ष पत्रकरिता करून लोकशाहीच्या चौथा स्तंभाला खरी आणि योग्य ओळख प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे नमूद केले.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आर्यन्सचे अध्यक्ष मुकुंदराव जगताप यांनी प्रारंभी मंत्री ना.मुंडे यांचे स्वागत केले.सीईओ मनोहर जगताप यांनी मिडिया हाऊस सुरू करण्यामागील भूमिका नमूद केली.यावेळी कार्यकारी संचालिका सौ.स्मिता शितोळे जगताप,ओमा फोंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप,
एएसएमग्रुपचे संचालक डॉ.संदीप पाचपांडे ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,राकेश बांदल,लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सचिन बोंबले,ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे,एक्सर एनर्जीचे एम.डी.त्रिलोकनाथ यादव
यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
आर्यन्स ग्रुपचे संचालक संजय शेंडगे, निखिल शितोळे,मंजिरी हगवणे,सुरेश रानवडे, कामेश मोदी,वैशाली ननवरे,वैशाली वाळुंज, स्नेहा जगताप,गोरख पवार,नेहा जगताप,कैलास बागव,अशोक कांबळे,महेश रानवडे,संतोष गुजर,सुमित रानवडे,किरण लोहार,अमित रानवडे,ईश्वर वाघमारे,किरण कानडे या संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे,निखिल जाधव, अविनाश उबाळे,प्रवीण कदम, विलास कोंढाळकर,सतिष पाटील,गुरुराज पोटे,संदीप राऊत यांनी परिश्रम घेतले.
jsEncrypt hello my website is jsEncrypt
electronic gaming hello my website is electronic gaming
talking about hello my website is talking about
pride characters hello my website is pride characters
Justin bieber hello my website is Justin bieber
ggames hello my website is ggames
Park Sung hello my website is Park Sung
Ai box hello my website is Ai box
majalah online hello my website is majalah online