मुंबई : जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. रघुनाथ कुचिक प्रकरणातील बलात्कार पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर केले. ज्यानंतर चित्रा वाघ यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. “पीडित मुलगी एकटी लढत होती, तिला साथ द्यायला महाराष्ट्रातील कोणताही राजकीय पक्ष तयार नव्हता. मी तिला साथ दिली, माझी चूक झाली काय? असा सवाल करत जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
रघुनाथ कुचिक प्रकरणातील बलात्कार पीडितेने चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझे अपहरण केल्याचा दावा केला. या लोकांनी माझे अपहरण करून मला गोव्याला नेले. या दरम्यान मला इंजेक्शन देऊन सतत गुंगीत ठेवले जात होते. यादरम्यान चित्रा वाघ माझ्याशी फोनवरून बोलायच्या. इकडे आल्यावर पोलिसांना काय सांगायचे, हेदेखील त्यांनी मला सांगून ठेवले होते, असा आरोप पीडितेने केला. पीडितेच्या आरोपानंतर एकच खळबळ माजली आहे. पीडितेचे सर्व आरोप फेटाळून लावत मला या प्रकरणात गोवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याच आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
ठपीडित मुलगी एकटी लढत होती, तिला साथ द्यायला महाराष्ट्रातील कोणताही राजकीय पक्ष तयार नव्हता. पण आज पीडितेने माझ्याविरोधात बोलायला सुरुवात केली तर सगळ्या राजकारणी महिला नेत्या एकत्र आल्या, असं सांगतानाच मी ब्लॅकमेल केलं म्हणणाऱ्या विद्या चव्हाण डोक्यावर पडल्या आहेत, असा निशाणा चित्रा वाघ यांनी साधला.
“पीडित मुलगी एकटी लढत होती, फेब्रुवारीपासून ती मदतीची याचना करत होती. मात्र त्यावेळी मी तिची मदत केली, ही माझी चूक झाली का? आता पीडितेच्या आरोपानंतर तिच्या मागे सर्वजण उभा राहिले, याचा आनंद वाटतो आहे”, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. पीडिता सत्ताधारी पक्षाच्या नराधमाविरोधात लढत आहे, त्यामुळे तिला अधिक खंबीर साथीची गरज असल्याने मी तिच्या पाठीमागे उभी राहिल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.
“पीडितेच्या आरोपानंतर सरकार नवीन एफआयर तयार करेल, ज्यामध्ये मी कशी अडकेन हे पाहिलं जाईल, पण मला सत्ताधाऱ्यांना सांगायचंय, की हे सगळं करुन तुम्ही माझा आवाज बंद कराल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे.
… [Trackback]
[…] Here you can find 33296 more Information on that Topic: marathi.reportertodaynews.com/inquiries-are-made-wherever-you-call-but-you-cant-silence-me-chitra-wagh/ […]
… [Trackback]
[…] Information to that Topic: marathi.reportertodaynews.com/inquiries-are-made-wherever-you-call-but-you-cant-silence-me-chitra-wagh/ […]