बार्टी प्रायोजित व MCED आयोजित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
Views: 159
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 56 Second

पुणे: बार्टी प्रायोजित व MCED आयोजित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे ( TEDP) उद्घाटन , AISSMS काॅलेज ॲाफ इंजिनअरिंग, पुणे येथे , मा.श्री. धम्मज्योती गजभिये सर ( मा. महासंचालक, बार्टी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मा. श्री. मदनकुमार शेळके( प्रकल्प अधिकारी, एम. सी. ई. डी.)यांनी केले.
मा. श्री.डाॅ. एस. व्ही. आठवले( एच. ओ. डी. काॅम्प्युटर सायन्स,काॅलेज ॲाफ इंजिनअरिंग, पुणे) यांनी प्रशिक्षणामध्ये अंतर्भूत विषय व व्याप्ती यावर तपशीलवार माहिती दिली.
मा. श्री. डाॅ. ए. व्ही. वाघमारे ( Training & Placement प्रमुख, AISSMS काॅलेज ॲाफ इंजिनअरिंग, पुणे) यांनी संस्था व काॅलेजची स्थापना तसेच उद्दिष्टे याबाबत, तसेच सदर प्रशिक्षणाचा माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी भविष्यातील या क्षेत्रातीस संधीबाबात, प्लेसमेंट व उद्योजक होण्यासाठी संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शनबाबत माहिती दिली.
मा. श्री. धम्मज्योती गजभिये सर( मा. महासंचालक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे) यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये बार्टी संस्थेच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी
प्रशिक्षण घेऊन स्वत: मध्ये Value Addition करत Upgrade व्हावे तसेच रोजगार स्वयंरोजगारासाठी सदर प्रशिक्षणाचा उपयोग करावा असे सुचित करत, प्रशिक्षणार्थींना तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षणार्थींना टूलकीटचे वाटप मा. महासंचालक सर यांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सातपुते यांनी केले .
शितल बंडगर यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, टीम पुणे जिल्हा समतादूत, एम. सी. ई. डी. अधिकारी कर्मचारी, AISSMS काॅलेज ॲाफ इंजिनअरिंग चे प्राध्यापक इ. उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?