मुंबई, 9 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (8 एप्रिल) हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणात 110 जणांना मुंबई पोलिसांना अटक केली आहे. तर आता या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवलं असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमतो आणि हल्ला करण्यात येतो हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचं फेल्युअर असल्याचं म्हटलं गेलं. ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात मग पोलीस का नाही पोहोचू शकत असाही प्रश्न उपस्थित झाला.
पोलिसांच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासा
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता.