मोहननगर, इंदिरानगर, चिंचवडस्टेशन या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा – मारुती भापकर
Views: 165
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 48 Second
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर, इंदिरानगर, साईबाबानगर, चिंचवडस्टेशन, काळभोरनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, परशुरामनगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात मारुती भापकर यांनी म्हटले आहे की,  येथील विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोरात भुकंतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांचा निद्रानाश होतो. लहान मुले दचकून घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले महिलांच्या अंगावर गुरगुरत धावून येतात त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तसेच या परिसरात सेकंड व थर्ड शिफ्टला कंपनीत कामाला जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री लागतात. त्यामुळे वाहने जोरात पळवावी लागतात. यामुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की, आपण या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना राबवण्याबाबत सक्त आदेश देऊन आमच्या विभागातील या समस्यांचे निराकरण करावे, अशा आशयाचे पत्र दि.११/८/२०२१ दिले होते. मात्र त्यावर आपण व आपल्या पशुवैद्यकीय विभागाने कुठलीही दखल घेऊन उपाय योजना राबवल्या नाहीत. त्यामुळेच सोमवार दि.९/५/२०२२ रोजी संध्याकाळी आमच्या मित्राची पत्नी व मुलगा मोहननगर मधून दुचाकी वाहनावर चाललेले असताना त्यांच्यामागे तीन कुत्री लागले. ते दोघे हि जोरात रस्त्यावर खाली पडले. दोघांना जबर मार लागला. नशिबाने त्यांचे प्राण वाचले. आमच्या या मित्राच्या पत्नीचा हात व पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे केवळ पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे घडले आहे. त्यामुळे संबंधित यातील दोषींवर कठोर कारवाई करून या समस्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण हे प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना तातडीने त्वरित राबवाव्यात अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध कायदेशीर व आंदोलनात्मक मार्ग स्वीकारावा लागेल.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?