Read Time:1 Minute, 31 Second
पिंपरी चिंचवड: डब्बू आसवानी याच्यावर खुनाचे प्रयत्न ,अट्रोसिटी ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अट्रोसिटी ऍक्ट च्या प्रकरणात याचा मुख्य साथीदार धन्नू अस्वानी हा 3 वर्षांपासून फरार आहे. पोलीस आयुक्त शिंदे यांनी डब्बू आसवानी व श्रीचंद आसवानी याच्य वर तडीपार ,मोक्का ची कारवाई करावी अशी मागणी अभिनव सिंग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ईमेलद्वारे केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अमर मुलचंदाणी यांना कोर्टाने अजून गुन्हेगार सिद्ध केलं नाही उलट आसवानी हा त्याचा साथीदार 3 वर्षांपासून फरार असलेला धन्नू आसवानीला पोलिसांकडून अटक होऊ नये म्हणून डब्बू आसवानी व श्रीचंद आसवानी टोळीवर तडीपार, मोक्काची कारवाई होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त शिंदे यांची दिशाभूल करत आहेत आणि भाजप पक्षाची बदनामी करत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देण्यात यावे, सिंग यांनी म्हटले आहे.