आम्हाला जर कोणी आरे म्हणले तर आम्ही कारे म्हणणार नाही, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही – आमदार संतोष बांगर
Views: 145
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 18 Second

हिंगोली : हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी थेट मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज हिंगोलीत देखील समर्थकांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केलं. मी बंडखोर नसून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. यावेळी आम्हाला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ काढला जाईल असा इशाराच बांगर यांनी दिला.

 

हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आज हिंगोलीत समर्थकांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केलं. मी बंडखोर नसून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाकीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील येत्या आठ दिवसाच्या आत आमच्याकडे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर हिंगोलीचे विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील हेच शिवसेना भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार राहतील, आणि त्यांना शिवसेना भाजप मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार अशी माहिती आमदार बांगर यांनी दिली आहे. आमदार बांगर यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदार हेमंत पाटील यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु, आमदार संतोष बांगर हे काहीही वक्तव्य करीत आहेत. मला कुठे उभे करायचे किंवा काय ते याचा निर्णय माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करतील, असा निर्वाळा व स्पष्टोक्ती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला जो कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम शिवसैनिक करतील. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला जर कोणी आरे म्हणले तर आम्ही कारे म्हणणार नाही, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हिंगोलीतील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आज हिंगोलीत समर्थकांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन करत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?